Sanjay Raut On Cross Voting : ...ती फुटलेली १० मतं कोणती याचा अंदाज होता... संजय राऊतांचा दावा

नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची काही मतं फुटली. त्याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत अनेक वक्तव्य केली आहेत.
Sanjay Raut On Cross Voting
Sanjay Raut On Cross Voting canva image
Published on
Updated on

Sanjay Raut On Cross Voting :

नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची काही मतं फुटली. त्याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत अनेक वक्तव्य केली आहेत. त्यांनी इंडिया आघाडी उपराष्ट्रपदाची निवडणूक चांगल्या पद्धतीनं लढल्याचं सांगितलं. याचबरोबर इंडिया आघाडीची काही मतं फुटली त्याबबात त्यांनी ही मतं कोणती असतील याचा अंदाज आधीच होता असं सूचक वक्तव्य देखील केलं. तसंच त्यांनी एवढी प्रचंड ताकद असूनही भाजपला फक्त १० मतंच फोडता आली असं देखील संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut On Cross Voting
Thar accident: नवी कोरी थार... चाकाखाली लिंबू चिरडायला गेली अन् पहिल्या मजल्यावरून आली खाली, व्हिडिओ व्हायरल

संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले, आमचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढली. विरोधीपक्षाची एकजूट दिसली. जयदीप धनखड यांना मिळालेली मतं ही ७५ टक्के होती. आता राधाकृष्णन यांना मिळणालेली मतं यांच्यात प्रचंड तफावत आहे. आमच्या उमेदवाराला ३०० मतं मिळाली आमची ताकद ३१४ ची होती. १५ मतं अवैध ठरवली ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी मत होती हे स्पष्ट आहे. निवडणूक अधिकारी कोणाचे असतात हे तुम्हाला माहिती आहे. जसं महाराष्ट्राच्या निवडणुकीत झालं तसं तिथंही होऊ शकतं.'

संजय राऊत पुढे म्हणाले,'तुम्ही म्हणता की क्रॉस वॉटिंग झालंय... झालंही असेल.. ज्याच्या हातात सत्ता आहे. प्रचंड तादक आहे. त्यांना फक्त १० मतं इकड तिकडं करता आलीत. ही १० मतं कोणती आहेत याचा अंदाज आम्हाला पहिल्यापासून होता. आम्ही निराश नाही आम्ही लढलो आम्ही ३०० च्या आकड्यावर थांबलो हा आकडा काही लहान नाही. संसदेत विरोधीपक्षाचा एकत्रित आकडा ३०० हा लहान नाही.

Sanjay Raut On Cross Voting
Vice President election: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सात ते आठ खासदारांनी केले क्रॉस वोटिंग

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात स्वतःच स्थान राखावं. एनडीएची काही मतं तटस्थ राहिली. केसीआर आणि बाकीच्या लोकांची मतं तटस्थ राहिली. भाजपची काही मतं तटस्थ राहिली. फडणवीसांना त्याच्यावर विचारा असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, नेपाळमधील हिंसाचार आणि अराजक स्थितीबाब संजय राऊत यांचं ट्विट व्हायरल होत होतं. पत्रकार परिषदेत त्यांनी नेपाळ आंदोलनाबद्दल देखील भाष्य केलं. ते म्हणाले, तुम्हाला काय ऐकायचं आहे... नेपाळची सीमा अनेक राज्यांना जोडली आहे. भारतात ७५ लाख नेपाळी राहतात. नेपाळमध्ये लागलेली आग ही सरकार विरोधात आहे. भारतात देखील लोक अस्वस्थ आहेत.'

ते पुढे म्हणाले, 'नेपाळ हा आपला मित्र आहे. ते लोक आपल्याला मोठा भाऊ मानतात. भारतातील युवा शांत वाटत आहे. मात्र त्याच्याही खूप समस्या आहेत. पंतप्रधान अनेकांना राशन वाटत आहेत. याचा अर्थ लोक गरीब आहेत. महात्मा गांधींचा जन्म इथं झालाय म्हणून हे लोकं वाचली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news