राहुल गांधींच्या खोट्या विधानामागे राजकीय हेतू: एस. जयशंकर यांचा पलटवार

S Jaishankar on Rahul Gandhi | जयशंकर यांच्या अमेरिका दौऱ्यावर राहुल गांधीची टीका
S Jaishankar on Rahul Gandhi |
राहुल गांधी यांच्या विधानावर जयशंकर यांनी पलटवार केला आहे. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यावर हल्लाबोल करत त्यांच्या अमेरिका दौऱ्यावर भाष्य केले. यावर परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांच्या विधानाला सोशल मीडियावरील पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे. (S Jaishankar on Rahul Gandhi)

ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डिसेंबर २०२४ मध्ये माझ्या अमेरिका भेटीबद्दल जाणूनबुजून खोटे विधान केले आहे. त्याच्या खोट्या बोलण्यामागील हेतू राजकीय असू शकतो. मी बायडेन प्रशासनाचे परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांना भेटायला गेलो होतो. आमच्या कॉन्सुल जनरलच्या बैठकीचे अध्यक्षस्थान देखील त्यांनी केले. माझ्या वास्तव्यादरम्यान, येणाऱ्या नवनियुक्त एनएसएने मला भेटले. या काळात पंतप्रधानांबाबतच्या निमंत्रणावर कोणत्याही पातळीवर चर्चा झाली नाही. आपले पंतप्रधान अशा कार्यक्रमांना उपस्थित राहत नाहीत. हे सर्वज्ञात आहे. खरं तर, भारताचे प्रतिनिधित्व सहसा विशेष दूत करतात. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधींच्या खोटेपणामागील हेतू राजकीय असू शकतो. पण ते परदेशात देशाचा अवमान करतात. (S Jaishankar on Rahul Gandhi)

राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात काय म्हटले?

केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, आपल्या बँकिंग क्षेत्रात फक्त दोन किंवा तीन मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व असू नये आणि लहान आणि मध्यम वर्गातील कंपन्यांनाही बँकिंग क्षेत्रात सहज प्रवेश मिळाला पाहिजे. जर असे झाले असते तर आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना तीन-चार वेळा अमेरिकेत जाऊन आपल्या पंतप्रधानांना आमंत्रण देण्याची विनंती करावी लागली नसती. जर आपण या क्षेत्रात काम केले असते, तर अमेरिकेने स्वतः आपल्या पंतप्रधानांना आमंत्रित केले असते.

राहुल गांधींच्या विधानावर सत्ताधारी पक्षाने आक्षेप घेतला

तर दुसरीकडे, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींच्या विधानावर तीव्र आक्षेप घेत म्हटले आहे की, विरोधी पक्षनेत्याने कोणतेही तथ्य आणि पुराव्याशिवाय असे गंभीर आरोप करू नयेत. हा दोन्ही देशांमधील संबंधांचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत निराधार आरोप करू नयेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच चीनच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या शपथविधी समारंभासाठी आमंत्रित केले होते, परंतु या शपथविधी समारंभात भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केले होते.

S Jaishankar on Rahul Gandhi |
'एम्स'मध्ये येणारे रुग्ण, कुटुंबियांना चांगल्या सुविधा द्या : राहुल गांधी  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news