Paraglider Rescue : तब्बल ३ तास मृत्यूची टांगती तलवार! उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांवर अडकला पॅराग्लाइडर; पुढे काय घडलं?

Dramatic Paraglider Rescue : एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि एनएचएआयने तीन तास चालवली अथक बचाव मोहीम
High-Voltage Rescue: Paraglider Saved After 3 Hours
रशियन पॅराग्लाइडर वैमानिक महामार्गावर सुमारे १०० मीटर उंचीवर असलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये (हाय-टेन्शन वायर्स) अडकला होता.Pudhari news.
Published on: 
Updated on: 

Dramatic Paraglider Rescue : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना टळली आहे. रशियन पॅराग्लाइडर वैमानिक मंडी परेड महामार्गावर सुमारे १०० मीटर उंचीवर असलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये (हाय-टेन्शन वायर्स) अडकला. तब्‍बल तीन तास तो याच अवस्‍थेत होता. अखेर एसडीआरएफ (SDRF), एनडीआरएफ (NDRF) आणि एनएचएआय (NHAI) यांनी क्रेनच्या मदतीने तीन तास चालवलेल्या अथक मोहिमेनंतर, पॅराग्‍लाइडरची सुखरुप सुटका करण्‍यात आली.

उड्डाणादरम्यान पॅराग्लाइडर वीजवाहिन्यांमध्ये अडकला

सोमवारी दुपारी मंडीमधील 'तांडू' (Tandu) परिसरात उड्डाणादरम्यान पॅराग्लाइडर वीजवाहिन्यांमध्ये अडकला. ॲलेक्सीने कांग्रा जिल्ह्यातील 'बीर बिलिंग' या जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या पॅराग्लाइडिंग स्थळावरून उड्डाण केले होते. उड्डाणादरम्यान, तो अचानक उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये अडकला आणि जमिनीपासून अनेक मीटर उंचीवर लटकलेल्या अवस्थेत राहिला.

High-Voltage Rescue: Paraglider Saved After 3 Hours
Yaniv Hayoun Flydubai flight rescue: इस्त्रायलच्या एका प्लंबरने कोसळणाऱ्या विमानावर कसं मिळवलं नियंत्रण? वाचवले १७४ प्राण

पॅराग्लाइडरने आपल्या फोटोसह लोकेशन केले शेअर

या घटनेनंतर, वैमानिकाने आपल्या मोबाईल फोनद्वारे काही छायाचित्रे आणि स्वतःचे लोकेशन 'बीर बिलिंग पॅराग्लाइडिंग असोसिएशन'ला पाठवले. त्यानंतर ही माहिती मंडी जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. तत्काल बचावकार्य सुरू करण्यात आले.

High-Voltage Rescue: Paraglider Saved After 3 Hours
Khar Police Rescue: पोलिस जवळ पोहोचताच त्याने समुद्रात उडी मारली अन्...; खारमध्ये थरारक बचावकार्य, तरुणाचा जीव थोडक्यात वाचला

वैमानिकाला सुरक्षितपणे खाली उतरवले

असोसिएशनकडून मिळालेल्या माहितीनंतर मंडी जिल्हा प्रशासनाने तातडीने बचाव मोहीम हाती घेतली. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर, या रशियन वैमानिकाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आले. या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना मंडीच्या उपायुक्तांनी सांगितले की, दुपारी प्रशासनाला माहिती मिळाली की एक पॅराग्लाइडर वैमानिक तांडू परिसरातील उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांवर अडकला आहे. बचाव कार्याचे गांभीर्य लक्षात घेता, त्वरित क्रेन आणि इतर आवश्यक संसाधने घटनास्थळी पाठवण्यात आली. तसेच, भारतीय हवाई दलाचीही मदत मागवण्यात आली होती; मात्र, हवाई दलाची मदत मिळण्यापूर्वीच, क्रेनच्या साहाय्याने वैमानिकाची सुखरूप सुटका करण्यात आली. या थरारक घटनेचा व्‍हिडिओ मॅन फ्रॉम हिमालयन व्हिलेज या इन्‍टा पेजवर शेअर करण्‍यात आला आहे.

High-Voltage Rescue: Paraglider Saved After 3 Hours
Gorakh Dhanwate Rescue: ५० फूट खोल, तीन फूट रुंद विहिरीत दोन दिवस; बंद मोबाईल अचानक सुरू झाला अन्‌ वाचला जीव!

समन्वित प्रयत्नांमुळे पॅराग्लाइडरला सुरक्षितपणे वाचवण्यात यश

ही बचाव मोहीम नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI), 'गवार कन्स्ट्रक्शन कंपनी', स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (SDRF) आणि नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) यांनी संयुक्तपणे राबवली. त्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे वैमानिकाला सुरक्षितपणे वाचवणे शक्य झाल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.