Bhopal Murder Case | माजी आयएएस अधिकाऱ्याची भोपाळमध्ये गळा चिरून हत्या; बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

घटनेनंतर केअरटेकर बेपत्ता
Bhopal Murder Case |
Murder Case | माजी आयएएस अधिकाऱ्याची भोपाळमध्ये गळा चिरून हत्या; बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
Published on: 
Updated on: 

भोपाळ; वृत्तसंस्था : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये निवृत्त आयएएस अधिकारी राकेश अग्रवाल यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सूरजनगरमधील पनघट कॉलनीच्या मागील भागात असलेल्या त्यांच्या घरातील बेडरूममध्ये बुधवारी पहाटे त्यांचा मृतदेह आढळून आला. रतिबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हत्या रात्री २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान झाल्याचा संशय आहे.

या प्रकरणात वरुण कुमार नावाचा केअरटेकर पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आहे. त्याला एका एजन्सीमार्फत अवघ्या तीन दिवसांपूर्वी २४ तासांसाठी केअरटेकर-कम-मेल नर्स म्हणून कामावर ठेवण्यात आले होते. तो पंजाबचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत असून, घटनेनंतर तो बेपत्ता आहे.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाने घराची तपासणी करून विविध पुरावे गोळा केले आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, हत्येच्या वेळी घरात कोण उपस्थित होते आणि संशयित घटनास्थळावरून कसा बाहेर पडला, याचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news