अभिनेता दर्शनच्‍या न्‍यायालयीन कोठडीत वाढ

रेणुका स्वामी हत्या प्रकरण, ४ जुलै राेजी पुढील सुनावणी
रेणुका स्वामी हत्या प्रकरण: अभिनेता दर्शनला कोठडी
रेणुका स्वामी हत्या प्रकरण: अभिनेता दर्शनला कोठडीPudhari Newsnetwork

पुढारी न्यूज नेटवर्क:  बहुचर्चित रेणुकास्वामी हत्या प्रकरणी अभिनेता दर्शन थुगुदीपा आणि अन्य तीन आरोपींना  आज ( दि.22)  ४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.  या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ४ जुलै राेजी हाेणार आहे

काय आहे प्रकरण?

कन्नड चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध  अभिनेता दर्शनला गेल्‍या आठवड्यात पोलिसांनी हत्‍या प्रकरणात अटक केली होती. हे प्रकरण दर्शनचाच एक चाहता रेणुकास्‍वामीच्या हत्‍येशी संबंधीत आहे. दर्शनची मैत्रीण पवित्राला आक्षेपार्ह मेसेज पाठवले होते. त्‍यामुळे संतापलेल्‍या दर्शनने रेणुकास्‍वामी नावाच्या व्यक्‍ती विरोधात सुपारी देवून त्‍याची हत्‍या केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी या प्रकरणी दर्शन आणि पवित्रासह १७ लोकांना अटक केली. आता रेणुकास्‍वामीच्या पोस्‍टमार्टम रिपोर्टमधून ही त्याला इलेक्‍ट्रिक शॉक देवून छळ केल्याती माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news