World's longest Hair : पावणेनऊ फूट लांब केस! सर्वाधिक लांब केस असण्‍याचा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' आता भारतीय महिलेच्‍या नावावर

जगात आजवरच्या सर्वात उंच व्यक्तीच्या उंचीइतकीच रेणू धरियाल यांच्या केसांची लांबी
World's longest Hair
उत्तराखंडच्या रेणू धरियाल यांनी महिलांमध्ये सर्वाधिक लांब केस असण्याचा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' आपल्या नावावर केला आहे. Guinness World Records X
Published on
Updated on

World's Longest Hair Female : उत्तराखंडच्या रेणू धरियाल यांनी आपल्या चिकाटीने आणि संयमाने एक नवा इतिहास रचला आहे. तब्बल २७१.५० सेमी (८ फूट १० इंच) लांब केसांसह त्यांनी जिवंत महिलांमध्ये सर्वाधिक लांब केस असण्याचा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' आपल्या नावावर केला आहे. हलद्वानी येथे एप्रिल महिन्यात त्यांच्या केसांची अधिकृत मोजणी करण्यात आली होती.विशेष म्हणजे, जगात आजवरच्या सर्वात उंच व्यक्तीच्या (रॉबर्ट वाडलो - २७२ सेमी) उंचीइतकीच जवळजवळ रेणू यांच्या केसांची लांबी आहे! २०१५ सालापासून त्यांनी एकदाही केस कापले नाहीत.

युक्रेनच्या अ‍ॅलिया नासिराला टाकले मागे

याआधी हा विक्रम युक्रेनच्या अ‍ॅलिया नासिरा यांच्या नावावर होता, ज्यांच्या केसांची लांबी २५७.३३ सेमी (८ फूट ५.३ इंच) होती. रेणू यांनी अ‍ॅलिया यांचा विक्रम १४ सेमीपेक्षा जास्त फरकाने मोडीत काढला आहे.

World's longest Hair
Social Media Age Limit India : १३ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया, ऑनलाइन गेमिंगला पालकांची संमती अनिवार्य? खासगी विधेयक

भारतीय पंरपरेतून मिळाली प्रेरणा : रेणू धरियाल

या विक्रमाबाबत रेणू म्हणाल्या, "भारतीय संस्कृतीत लांब केस हे सौंदर्य आणि परंपरेचे प्रतीक मानले जातात. याच परंपरेतून मला प्रेरणा मिळाली. इतक्या लांब केसांची निगा राखणे ही सोपी गोष्ट नाही. तासनतास केस धुणे आणि विंचरणे यासाठी मोठा संयम लागतो. रासायनिक उत्पादनांऐवजी त्या स्वतः घरी तयार केलेले तेल आणि नैसर्गिक शॅम्पू वापरतात.

World's longest Hair
Protein Intake Longevity : कमी प्रोटीनचे सेवन ठरू शकते निरोगी वृद्धत्वासाठी फायदेशीर! नव्या संशोधनातून काय समोर आले?

सोशल मीडियावर बनल्या 'स्टार'

रेणू या एक युट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर असून त्या सोशल मीडियावर महिलांना केसांची निगा राखण्याच्या टिप्स देतात. घराबाहेर पडल्यावर किंवा सोशल मीडियावर त्यांच्या या लांबसडक, चमकदार आणि दाट केसांकडे लोक आश्चर्याने पाहतात. हा केवळ एक विक्रम नसून भारताचे आणि माझ्या क्षेत्राचे नाव उज्ज्वल करण्याची संधी आहे, असे रेणू सांगतात. जवळपास दशकभराचे सातत्य आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी हा जागतिक विक्रम साकार केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news