Viral News: कॉफी डेटसाठी १५००, तर वीकेंडसाठी १० हजार; तरुणीच्या रेट कार्डमुळे सोशल मीडियावर नवा वाद

सोशल मीडियावर सध्या एक वादग्रस्त जाहिरात फिरत आहे. 'रेंट मी फॉर अ डे' (मला एका दिवसासाठी भाड्याने घ्या) अशा आशयाचे एक 'रेट कार्ड' 'एक्स'वर व्हायरल झाले आहे.
Viral rent a girlfriend post
Viral rent a girlfriend postFile Photo
Published on
Updated on

Viral rent a girlfriend post

नवी दिल्ली: सोशल मीडियावर दोन वर्षापूर्वी व्हायरल झालेल्या 'रेंटवर गर्लफ्रेंड मिळेल' या रीलनंतर पुन्हा सध्या तशीच एक वादग्रस्त जाहिरात फिरत आहे. 'रेंट मी फॉर अ डे' अशा आशयाचे एक 'रेट कार्ड' 'एक्स'वर पुन्हा व्हायरल झाले आहे. या रेट कार्डमध्ये एका तरुणीसोबत वेळ घालवण्यासाठी, कॉफी डेटपासून ते वीकेंड ट्रिपपर्यंतचे दर पत्रक आहे.

'नलिनी उनागर' नावाच्या एका 'एक्स' युझरने 'दिव्या' नावाच्या तरुणीचे रेट कार्ड सोशल मीडियावर शेअर केले आहे. या दरपत्रकानुसार, ग्राहकांच्या विविध गरजांनुसार वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत: कॉफी डेट: १,५०० रुपये, डिनर आणि मुव्ही: २,००० रुपये, कुटुंबाची भेट घेणे: ३,००० रुपये, एखाद्या कार्यक्रमात सोबत जाणे: ३,५०० रुपये, बाईक राईड: ४,००० रुपये, सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणे: ६,००० रुपये.

याशिवाय काही विशेष 'प्लॅन्स' देखील यात समाविष्ट आहेत. जसे की, एकत्र स्वयंपाक करण्यासाठी ३,५०० रुपये, शॉपिंगसाठी ४,५०० रुपये आणि दोन दिवसांच्या वीकेंड ट्रिपसाठी १०,००० रुपये आकारले जात आहेत.

दरम्यान, दोन वर्षापूर्वी गुरुग्राम येथील दिव्या गिरी या तरुणीने अशीच एक रील बनवली होती. तिने इंस्टाग्रामवर डेटचे दर देखील शेअर केले होते. नंतर मात्र तिने गमंत म्हणून पोस्ट केल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

Viral rent a girlfriend post
Orry Reel Earnings: सेलिब्रिटींचा यार ओरीला एका रीलसाठी किती रुपये मिळतात? कमाईचा आकडा वाचून तुम्हालाही बसेल धक्का

दिल्लीत 'रेंटल गर्लफ्रेंड'चा नवा ट्रेंड; दिवसाला ६ ते ७ हजारांची कमाई

हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. 'मिक्कू' नावाच्या दुसऱ्या एका युझरने दिल्लीतील तरुणी कशा प्रकारे 'रेंटल गर्लफ्रेंड' बनून महिन्याला हजारो रुपये कमवत आहेत, याबद्दल सांगितले आहे. त्याच्या पोस्टनुसार, "दिल्लीतील मुली या प्लॅटफॉर्मचा वापर करून मोफत जेवण, मोफत शॉपिंग आणि फक्त सोबत राहण्यासाठी तासाला १,००० रुपये कमावत आहेत. अनेकदा एका दिवसात त्यांना ३ ते ४ बुकिंग मिळतात. यातून त्यांचे जेवण आणि शॉपिंगचा खर्च तर निघतोच, शिवाय दिवसाला ६ ते ७ हजार रुपयांची कमाई होते."

या पोस्टसोबत एक व्हिडिओ देखील आहे, ज्यामध्ये एक तरुणी 'KoPartner.in' नावाच्या वेबसाईटचा उल्लेख करते. हा भारतातील अशा प्रकारचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असल्याचा दावा तिने केला आहे. व्हिडिओमध्ये ती एका ग्राहकाला कॅफेमध्ये भेटते, गप्पा मारते आणि ग्राहकाकडून शॉपिंग करून घेते. या दोन तासांच्या भेटीसाठी तिला २,००० रूपये मिळाल्याचे ती दाखवते.

नैतिकतेचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या प्रकारच्या जाहिराती आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र मतभेद पाहायला मिळत आहेत. काहींच्या मते हा रोजगाराचा नवा पर्याय आहे. तर काहींनी यावर चिंता व्यक्त केली आहे. मात्र पैशांच्या बदल्यात मिळणाऱ्या या तात्पुरत्या नात्यांमुळे आणि 'रेंटल गर्लफ्रेंड'च्या वाढत्या ट्रेंडमुळे सध्या समाजमाध्यमांवर नैतिकतेचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Viral rent a girlfriend post
Success Story: पगार सोडून तरुणीने एका महिन्यात कमावले ६३ लाख रुपये; सांगितले उत्पन्नाचे ६ स्रोत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news