प्रख्यात ह्रदयरोगतज्ञ डॉ. एम. एस वालियाथन यांचे निधन

मणिपाल विद्यापीठाचे पहिले कुलगुरू
Dr. M. S Valiathan
डॉ. एम. एस वालियाथन यांचे निधन File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. एस. वलियाथन यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन. कर्नाटकमधील मणिपाल रुग्णालयात बुधवारी रात्री निधन झाले. डॉ. वालियाथन हे श्री चित्रा थिरुनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि संचालक होते.

प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. एस. वलियाथन यांचे कर्नाटकमधील मणिपाल रुग्णालयात बुधवारी (दि.१७) रात्री निधन झाले. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे माजी अध्यक्ष आणि सरकारचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक असलेल्या डॉ. वलियाथन यांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. ते मूळचे मावेलीकराचा असून त्यांच्या पश्चात पत्नी अशिमा आणि मुले मन्ना आणि मनीष आहेत.

मणिपाल विद्यापीठाचे पहिले कुलगुरू

डॉ. एम. एस. वलियाथन तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते. त्यांनी जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम केले आहे. मणिपाल विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डॉ. वालियाथन कार्यरत होते. त्याचबरोबर जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या फॅकल्टीवरही होते. डॉ. वालियाथन यांना आरोग्य तंत्रज्ञानातील योगदानामुळे २००५ मध्ये पद्मविभूषण आणि १९९९ मध्ये फ्रेंच सरकारने ऑर्डे डेस पाल्मेस अकादमीचा चेव्हॅलियर पुरस्कार मिळाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news