दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतातील बहुतांश भागात उष्णतेची लाट आहे. सर्वत्र उष्ण आणि दमट हवामान आहे. या वातावरणामुळे नागरिक हैराण आहेत. दरम्यान हवामान विभागाने भारतातील बहुतांश भागातील हवामान बदलाचे संकेत दिले आहेत. पुढील काही दिवस देशभरातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड या भागात ६ मे पर्यंत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान 40-50 किमी/ता. ते 60 किमी/ता. पर्यंत वादळी वाऱ्याची देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशा आणि बिहारमध्ये ५ ते ६ मे दरम्यान वादळसदृश वारे (50-60 किमी/ता. ते 70 किमी/ता. पर्यंत) वाहण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशच्या पूर्व भागात ४ मे रोजी विजेचा कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता.
४ मे रोजी ओडिशामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये ४ ते १० मे दरम्यान वादळी वारे (40-60 किमी/ता.) व विजेसह हलका ते मध्यम पाऊस आहे.
हिमाचल प्रदेश (४-६ मे), उत्तराखंड (४-६ मे) मध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.
राजस्थान (४ मे), उत्तराखंड (४ ते ६ मे), पंजाब, हरियाणा, दिल्ली, ईशान्य उत्तर प्रदेश (४-६ मे) वादळसदृश वारे वाहण्याचा अंदाज.
४ मे रोजी पश्चिम राजस्थानात वादळी वारे.
६ ते ७ मे रोजी पश्चिम उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता.
पुढील ७ दिवस कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, रायलसीमा, केरळ, तामिळनाडू आदी भागांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊसाची शक्यता आहे. दरम्यान वाऱ्याचा वेग 30-50 किमी/ता.
उत्तर कर्नाटक अंतर्गत ५ आणि ६ मे, तसेच दक्षिण कर्नाटकामध्ये ६ आणि ७ मे रोजी गारपीट.
६ ते ७ मे रोजी वादळसदृश वारे.
६ ते ७ मे रोजी केरळ व माहे, तसेच ५-६ मे रोजी तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता.
अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयमध्ये आगामी ७ दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व वादळी वारे (30-50 किमी/ता.) . तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे ४ ते ८ मे दरम्यान मेघगर्जनेसह हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता. वारे (40-50 किमी/ता. ते 60 किमी/ता.)
७ मे रोजी कोकण, गोवा व मराठवाड्यात गारपीट.
६ मे रोजी कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्रात वादळसदृश वारे.
४ मे रोजी कोकण व गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता.