पुढारी ऑनलाईन डेस्क : कोविड काळातील तुलनेत भारताची देशांतर्गत आर्थिक व्यवस्था आता खूप मजबूत स्थितीत आहे. मजबूत भांडवल पर्याप्तता, नॉन-परफॉर्मिंग मालमत्तेची निम्न पातळी, बँका आणि बिगर बँकिंग नफा (NBFC) याद्वारे वित्तीय प्रणाली मजबूत स्थितीत असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे. मुंबई येथे आज (दि.२०) 'वित्तीय व्यवस्था लवचिक, भविष्यासाठी सज्ज आणि संकटमुक्त ठेवणे' या विषयावरील सत्राला त्यांनी संबोधित केले.
यावेळी शक्तीकांत दास म्हणाले की, ३१ मार्च रोजी संपलेल्या वर्षात उत्कृष्ट कामगिरीबद्दल मी बँका आणि इतर वित्तीय क्षेत्रातील संस्थांचे कौतुक करू इच्छितो. परंतु जग बदलत आहे, आव्हाने येत आहेत, गुंतागुंत वाढत आहेत, त्यामुळे आत्मसंतुष्टतेला अजिबात जागा नाही. देशाच्या किंवा जगाच्या आर्थिक व्यवस्थेच्या कोणत्याही कोपऱ्यातून समस्या उद्भवू शकतात, असे दास यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :