

पुढारी ऑनलाईन डेस्क: बलात्कार आणि हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या राम रहीमवर हरियाणा सरकारने पुन्हा एकदा मेहरबानी केली आहे. हरियाणा सरकारने राम रहीमला २१ दिवसांच्या पॅरोलवर रजा देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राम रहीमला जेलमधून सुट्टी देण्यात आली आहे. राम रहीम सुनारिया तुरुंगाबाहेर आहे. या २१ दिवसांमध्ये राम रहीम यूपीच्या बनवाडा येथील आश्रमात राहणार आहेत.
डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमच्या तात्पुरत्या सुटकेविरोधात सर्वोच्च गुरुद्वारा संस्था एसजीपीसीने याचिका दाखल केली होती. यावेळी त्यांनी युक्तिवाद केला होता की, डेरा प्रमुख खून आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी अनेक दिवसांपासून शिक्षा भोगत आहे. जर त्याची सुटका झाली तर ते भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका निर्माण करेल. सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरित परिणाम करेल. आपल्या दोन अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीम २० वर्षांची शिक्षा भोगत असून, तो रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगात बंद आहे. यापूर्वी १९ जानेवारी रोजी त्याला ५० दिवसांचा पॅरोल देण्यात आला होता.
डेरा प्रमुख गुरमीत सिंगला पहिल्यांदा १७ जून २०२२ रोजी ३० दिवसांचा पॅरोल मिळाला होता. त्यानंतर ते बर्णवा आश्रमात राहिले. १८ जुलै रोजी पुन्हा सुनारिया तुरुंगात गेला.
८८ दिवसांनंतर त्याला १५ ऑक्टोबरला दुसऱ्यांदा पॅरोल मिळाला. २५ नोव्हेंबर रोजी तो पुन्हा सुनारिया तुरुंगात गेला.
२१ जानेवारी २०२३ रोजी गुरमीत सिंग तिसऱ्यांदा ४० दिवसांच्या पॅरोलवर बर्नावा आश्रमात आला होता. ३ मार्च रोजी पॅरोल संपल्यानंतर तो पुन्हा सुनारिया कारागृहात गेला.
चौथ्यांदा डेरा प्रमुख ३० दिवसांच्या पॅरोलवर २० जुलै रोजी बर्नवा आश्रमात पोहोचला. त्यानंतर २० ऑगस्टला तो पुन्हा तुरुंगात गेला.
२१ नोव्हेंबर रोजी, बर्नावा तुरूंगातून तो २१ दिवसांच्या पॅरोलवर पाचव्यांदा पुन्हा आला. १३ डिसेंबर रोजी पुन्हा सुनारिया तुरुंगात गेला.
19 जानेवारी 2024 रोजी तो पुन्हा 50 दिवसांच्या पॅरोलवर आला. 10 मार्च रोजी पुन्हा तुरुंगात गेला.