पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात आज शालेय मुलींनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. विशेष म्हणजे पीएम मोदींसाठी ही खास राखी बनवली असून, त्यामध्ये त्यांची आई आणि त्यांच्या फोटोचा समावेश आहे. सोबतच त्यावर एक खास संदेशही लिहिला आहे.
भगिनींच्या अतूट प्रेमाचा आणि आपुलकीचा सण रक्षाबंधनाच्या निमित्ताने तमाम देशवासियांना खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. 'हा' रक्षणाचा धागा सदैव आपल्या पवित्र नात्याला घट्ट ठेवो, अशा शुभेच्छा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स अकाऊंटवरून दिल्या आहे. यासोबत त्यांनी प्रियंका गांधी यांच्या सोबतचा फोटोही शेअर केला आहे.
परम शक्ती पीठ आणि वात्सल्यग्रामच्या संस्थापक साध्वी ऋतंभरा यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत दिल्लीत 'रक्षाबंधन' साजरा केला.
राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या उषा राणा यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधली.
रक्षाबंधनानिमित्त महिला नेत्यांनी आणि ब्रह्माकुमारींनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या उंडवल्ली निवासस्थानी राखी बांधली.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आणि खासदार पीयूष गोयल यांनी पाकिस्तानी हिंदू महिला निर्वासितांसोबत रक्षाबंधन साजरे केले
माझ्या मनगटावर बांधलेली ब्रह्माकुमारी भगिनींची राखी त्यांच्या अपार प्रेमाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक म्हणून मला नेहमीच शक्ती देईल.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची बहीण सुनीता साळुकणे यांच्यासोबत मुंबईतील त्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन साजरे केले.
राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केला. राज्यातील बहुतांशी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून, महिलांच्या खात्यावर ३ हजार रूपये जमा झाले आहेत. या आनंदासह महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
लाडक्या बहिणींचा, लाडका भाऊ, तुमचा, आमचा, सगळ्यांचा देवाभाऊ!, असे म्हणत राज्यातील सर्व महिलांचा लाडका भाऊ म्हणजे 'देवाभाऊ' साठी दूरवरच्या बहिणींनी सुद्धा राख्या पाठवल्या असून आपल्या भावाला भरभरून शुभाशीर्वादही दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे केले.
रक्ताच्या पलीकडलं आम्हा भावाबहीणीचं हे अतूट नातं…. हे नातं बळ देतं ….हिंमत देतं, अशी पोस्ट भाजप महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्ष नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. तर भाजप नेते प्रसाद लाड यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, लाडकी माझी ताई... दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या ताईसाहेब चित्राताई वाघ यांच्यासमवेत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. ताई, मागील १८ वर्षांपासून तू मला राखी बांधत आहेस! तू बांधलेल्या त्या प्रत्येक राखीतील तुझे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि आशीर्वाद मला नव्याने बळ देतात! तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा! अशीच आनंदी रहा, सुखी रहा!
इडा पीडा जाऊ दे...भावाचे राज्य येवू दे.. भावाला माझ्या सौख्य लाभू दे.. त्याचा वंशवेलू गगनाला भिडू दे... असे म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना राखी बांधत साजरा केला रक्षाबंधनाचा सण