सिरसा (हरयाणा), पुढारी ऑनलाईन : शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) मंगळवारी हरयाणातील सिरसामध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहे की, "उत्तरप्रदेशसाठी लोक एखाद्या मोठ्या हिंदू नेत्याची हत्या घडवून आणतील आणि त्यानंतर भेदभावाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतील", असं वादग्रस्त वक्तव्य टिकैत यांनी आरएसएस-भाजपवर निशाणा साधला आहे.
करनालमध्ये शेतकऱ्यांवर जो लाठीचार्ज करण्यात आला, त्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा, करण्याची मागणी राकेश टिकैत यांनी केली आहे. टिकैत पुढे म्हणाले की, "करनालमध्ये आम्हाला सरकारी तालिबानी कमांडर पाहायला मिळाले. हरयाणा सरकारकडून शेतकऱ्यांवर लाटीचार्ज घडवून आणला जात आहे. शेतकरी तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत", अशी टीका राकेश टिकैत यांनी केली आहे.
"शेतकरी आंदोलन संपविण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करण्यात आले. हिंदू-शीख, हिंदू-मुस्लीम, एकमेकांना भिडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता युपीच्या निवडणुका होतील तेव्हा आरएसएसचे लोक एखाद्या मोठ्या हिंदू नेत्याची हत्या घडवून आणण्याचं काम करतील. निवडणुकीत हिंदू-मुस्लीम करत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिंदू नेत्यांची हत्या घडवून आणून यांना निवडणुका जिंकायच्या आहेत", असं थेट वादग्रस्त वक्तव्य राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केलं आहे.
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर पहिल्यापासूनच शेतकऱ्यांचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू. शेतकरी आंदोलनाचं केंद्र दिल्लीऐवजी हरयाणात वळवावं, असा मुख्यमंत्री खट्टर यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे, हरयाणात अशा पद्धतीच्या घटना जाणून-बुजून घडवून आणण्यात येत आहेत. परंतु, आम्ही केंद्राशी निपटण्यासाठी सज्ज आहोत", असंही राकेश टिकैत यांनी म्हंटलं आहे.
पहा व्हिडीओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले