Rajasthan Lok Sabha| राजस्थानमध्ये भाजप ६ जागांवर विजयी, काँग्रेसची मुसंडी

Rajasthan Lok Sabha| राजस्थानमध्ये भाजप ६ जागांवर विजयी, काँग्रेसची मुसंडी

पुढारी ऑनलाईन डेस्क: राजस्थानमधील लोकसभेच्या 25 जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत सुरू आहे.  मतमोजणी सुरु आहे. दुपारी दाेन वाजता भाजपने आघाडीवर असलेल्या सहा जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने तीन जागा काबीज केल्या आहेत.

राजस्थानात भाजप 13 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानात मतमोजणी सुरू असून, अतितटीची लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे तिन्ही आघाडीचे उमेदवारही मोठ्या फरकाने विजयी होताना दिसत आहेत. निकालात हा आकडा बदलला तर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जाईल.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत जालोर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाला आहे. येथे भाजपचे लुंबाराम विजयी झाले आहेत. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र आणि भाजपचे उमेदवार दुष्यंत सिंह यांनी झालावाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news