Viral Video | ड्रेस घेण्यावरुन पती - पत्‍नीत भांडण, रागाच्या भरात पतीने वर्षभर साठवलेले पैसे रस्त्‍यावर जाळले!

पैसेच नाही तर भांडणही नाही, पत्‍नी चिडून माहेरी गेल्यावर पतीने उचलले मोठे पाऊल
Viral Video | ड्रेस घेण्यावरुन पती - पत्‍नीत भांडण, रागाच्या भरात पतीने वर्षभर साठवलेले पैसे रस्त्‍यावर जाळले!
Viral Video | ड्रेस घेण्यावरुन पती - पत्‍नीत भांडण, रागाच्या भरात पतीने वर्षभर साठवलेले पैसे रस्त्‍यावर जाळले!
Published on: 
Updated on: 

Rajasthan Viral News : राजस्थानमधून एक व्हिडीओ समोर आला आहे यामध्ये एक व्यक्ती रस्त्‍यावर बसून पैशाच्या नोटा जाळत असल्याचे दिसत आहे. त्‍याच्या बाजूला पैशाचे बंडलेही दिसत आहेत. ही घटना जयपूर येथील आहे या बाबत अधिक माहिती अशी की मंजित धाकड व त्‍याची पत्‍नी २२ हजाराचा ड्रेस (सूट) घेण्यावरुन या दोघांमध्ये भांडण झाले होते. पतीचे म्हणने होते की पहिल्यांदा घर घेऊ नंतर इतर खर्च करु यावरुन दोघात भांडण झाले, रागातून पत्‍नी माहेरला निघून गेली.

ना राहतील पैसे ना होतील भांडणे

जयपूर येथील रहिवासी मनजीत धाकड चे म्हणने होते आधी स्वतःचे घर खरेदी करू आणि त्यानंतर इतर हौस-मौज पूर्ण करू, असे पतीचे म्हणणे होते. त्‍यानंतर दोघांचा चांगलाच वाद झाला. या वादानंतर पती कामावर निघून गेल्यावर पत्नीने आपले सर्व सामान आवरले आणि ती माहेरी निघून गेली. घरी आल्यावर त्‍याला हे लक्षात आले पत्नीच्या या पावलामुळे संतापलेल्या पतीने कथितरित्या बँकेतून आपली वर्षभराची कमाई (जमापुंजी) काढली आणि रस्त्याच्या कडेला बसून नोटांना आग लावली. ना पैसे राहतीन ना भांडणे होतील असे त्‍याचे मत असल्याचे समजते.

घरासाठी ठेवले होते पैसे साठवून

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्यांमधून कळते की त्‍याने हे पैसे घरासाठी ठेवले होते. ते तो जाळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये जाळलेल्या नोटा खऱ्या होत्या की नकली, याची अधिकृत पोलीस किंवा प्रशासकीय पुष्टी मात्र झालेली नाही. पण या घटनेचा व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.