Crime News: प्रेम पडलं महागात! बॅडमिंटनपटूचे अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध; कुटुंबाने ३ दिवस डांबून ठेवलं, अमानुष छळ करून संपवलं

प्रेमसंबंधातून एका २१ वर्षीय राज्यस्तरीय बॅडमिंटनपटूचे अपहरण करून, तीन दिवस डांबून ठेवत त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Rajasthan badminton player killed Faridabad over a love affair
badminton player killed Faridabad over a love affairfile photo
Published on
Updated on

Rajasthan badminton player killed Faridabad over a love affair

फरीदाबाद: प्रेमसंबंधातून एका २१ वर्षीय राजस्थानमधील राज्यस्तरीय बॅडमिंटनपटूचे अपहरण करून, तीन दिवस डांबून ठेवत त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हरियाणातील फरीदाबादमध्ये उघडकीस आली आहे. मोनू (वय २१, रा. सैदपूर, भिवडी, राजस्थान) असे मृत तरुणाचे नाव आहे.

शाळकरी मुलीशी होते प्रेमसंबंध

मोनूने नुकतीच १२ वीची परीक्षा ७० टक्के गुणांसह उत्तीर्ण केली होती. तो एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू होता. त्याने राज्य आणि जिल्हा पातळीवर अनेक पदके जिंकली होती. मोनूचे फरीदाबादमधील तिगाव येथील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. ही मुलगी सैदपूर येथे तिच्या मामाच्या गावी येत असे, तिथेच दोघांची ओळख झाली आणि पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

Rajasthan badminton player killed Faridabad over a love affair
Crime News: प्रेमाचं वेड लागलं, घरात कोंबडा कापून रक्त सांडलं...; १६ वर्षांची मुलगी भयंकर कट रचून प्रियकरासोबत पळाली

मुलीच्या कुटुंबीयांकडून ३ दिवस अमानुष छळ

मोनूचे काका नरेंद्र यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार, १७ मे रोजी मोनू एका जुन्या प्रकरणाच्या चौकशीसाठी तिगाव पोलिस ठाण्यात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी त्याचे वाटेतच अपहरण केले. त्यांनी मोनूला तीन दिवस अज्ञात ठिकाणी डांबून ठेवून अमानुष छळ केला आणि बेदम मारहाण केली.

पोलिसांच्या माहितीनंतर घटना उघडकीस

२० मे रोजी मोनूच्या कुटुंबीयांना पोलिसांचा फोन आला. मुलीचे वडील कुलभूषण यांच्या घराबाहेर मोनू गंभीर जखमी अवस्थेत सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तीन दिवस झालेल्या सततच्या अमानुष मारहाणीमुळे मोनूच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या होत्या. शेवटी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मुलीच्या वडिलांनीच दिली पोलिसांना माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एप्रिल महिन्यात मोनू अल्पवयीन मुलीला घेऊन पळून गेला होता. याप्रकरणी मुलीचे वडील कुलभूषण यांनी तिगाव पोलिस ठाण्यात मोनूविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ती मुलगी नंतर पोलिसांना सापडली होती, मात्र मोनू तेव्हापासून फरार होता. दरम्यान, मोनू आपल्या घरी आल्याची माहिती कुलभूषण यांनीच पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा मोनू अत्यंत गंभीर अवस्थेत आढळला होता.

दोघांना घेतले ताब्यात

मोनूच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून अपहरण, हत्या आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Rajasthan badminton player killed Faridabad over a love affair
Crime News: 'हे आपले शेवटचे बोलणे...'; पत्नीने सकाळी लवकर उठवले म्हणून संतापलेल्या पतीने स्वतःवर गोळी झाडली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news