Railway Group D Recruitment 2026: रेल्वेमध्ये २१,९००+ जागांसाठी मेगाभरती! १०वी पास तरुणांना सुवर्णसंधी, असा करा अर्ज

RRB Group D Vacancy: रेल्वेमध्ये ग्रुप डी च्या २१९९७ पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
Railway Group D Recruitment 2026
Railway Group D Recruitment 2026file photo
Published on
Updated on

Railway Group D Recruitment 2026

नवी दिल्ली : रेल्वेमध्ये ग्रुप डी च्या २१९९७ पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. १० वी उत्तीर्ण तरुण www.rrbapply.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ३१ जानेवारी ते २ मार्च पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख ४ मार्च २०२६ आहे. ५ मार्च ते १४ मार्च पर्यंत अर्जात दुरुस्ती करता येणार आहे. मात्र, रेल्वे झोन निवडल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.

रेल्वेने असेही म्हटले आहे की, उमेदवारांनी त्यांचे आधार कार्ड आणि फोटो अपडेट करून घ्यावा. आधार कार्डवरील फोटो अपडेटेड असावा, तसेच नाव आणि जन्म तारीख १० वीच्या प्रमाणपत्राप्रमाणे असावी.

Railway Group D Recruitment 2026
SBI Recruitment 2026: SBI मध्ये २ हजारहून अधिक पदांसाठी भरती; ८५ हजार पगार, अर्ज कसा भरायचा?

केवळ एकच फॉर्म भरता येईल

उमेदवार फक्त एकाच रेल्वे झोनसाठी अर्ज करू शकतात. एकापेक्षा जास्त झोनसाठी अर्ज केल्यास फॉर्म बाद केला जाईल. एकाच झोनमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकता, त्यासाठी तुम्हाला पसंतीक्रम द्यावा लागेल. यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही.

वयोमर्यादा किती?

या भरतीसाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. (वयाची गणना १ जानेवारी २०२६ नुसार केली जाईल).

OBC: ३ वर्षे सूट.

SC/ST: ५ वर्षे सूट.

खुला प्रवर्ग/EWS: जन्म २ जानेवारी १९९३ ते १ जानेवारी २००८ दरम्यान असावा.

निवड प्रक्रिया कशी असेल?

निवड प्रक्रिया सिंगल स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि शारीरिक चाचणी यावर आधारित असेल. लेखी परिक्षला पात्र उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी होईल.

परीक्षेचे स्वरूप कसे असेल?

परीक्षा ९० मिनिटांची असून एकूण १०० प्रश्न असतील.

सामान्य विज्ञान : २५ प्रश्न

गणित : २५ प्रश्न

बुद्धिमत्ता : ३० प्रश्न

सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी: २० प्रश्न

निगेटिव्ह मार्किंग

प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ (एक तृतीयांश) गुण कमी केले जातील.

किमान उत्तीर्ण टक्केवारी

UR/EWS: ४०%

OBC/SC/ST: ३०%

Railway Group D Recruitment 2026
AI च्या सल्ल्याने HIV प्रतिबंधक औषधे घेतली… आणि जीवावर बेतलं! नेमकं काय घडलं?

शारीरिक चाचणी अटी काय आहेत?

पुरुषांसाठी:

३५ किलो वजन उचलून १०० मीटर अंतर २ मिनिटांत पार करणे.

१००० मीटर धावणे ४ मिनिट १५ सेकंदात पूर्ण करणे.

महिलांसाठी:

२० किलो वजन उचलून १०० मीटर अंतर २ मिनिटांत पार करणे.

१००० मीटर धावणे ५ मिनिट ४० सेकंदात पूर्ण करणे.

पगार आणि अर्जाचे शुल्क किती?

वेतन: १८,०००/- रुपये (लेवल-१ पे स्केल) अधिक भत्ते.

अर्ज शुल्क:

जनरल/OBC/EWS साठी ५०० रुपये (परीक्षा दिल्यास ४०० रुपये रिफंड मिळतील). SC/ST/महिला/EBC साठी २५० रुपये (परीक्षा दिल्यास पूर्ण २५० रुपये रिफंड मिळतील).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news