Rahul Gandhi | पांढरा टी-शर्ट का घालतो?; राहुल गांधींनी ‍‍व्हिडिओ शेअर करत सांगितले कारण

Rahul Gandhi | पांढरा टी-शर्ट का घालतो?; राहुल गांधींनी ‍‍व्हिडिओ शेअर करत सांगितले कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपण नेहमी पांढरा शर्ट का घालतो? हे सांगत "पांढरा टी शर्ट (White T Shirt)" अभियान सुरु केले आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्यांना ते पांढरा टी-शर्ट भेटवस्तू देणार आहेत. (Rahul Gandhi T-shirt)

काय म्हणाले राहूल गांधी?

  • माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार.
  • मला नेहमी प्रश्न विचारला जातो, "तुम्ही पांढरा टी-शर्ट नेहमी का घालता".
  • पांढरा टी-शर्ट पारदर्शकता, दृढता आणि साधेपणा यांच प्रतिनिधीत्व करतो.

पांढरा टी-शर्ट अभियान

कॉंग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी (दि.१९) आपला ५४ वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवसादिवशी त्यांनी आपण नेहमी पांढरा शर्ट का घालतो हे सांगत "पांढरा टी शर्ट (White T Shirt)" अभियान सुरु केले आहे. या अभियानात #WhiteTshirtArmy हा हॅशटॅग वापरत पांढरा टी-शर्ट अभियानात सहभागी होणाऱ्यांना ते पांढरा टी-शर्ट भेटवस्तू देणार आहेत. Rahul Gandhi T-shirt

पांढरा टी शर्ट : पारदर्शकता, दृढता आणि साधेपणा

राहुल गांधी यांनी आपल्या 'X' अकाउंटवर आपल्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे, "वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार. मला नेहमी प्रश्न विचारला जातो की, तुम्ही नेहमी पांढरा टी शर्ट का घालता? तर हा पांढरा टी शर्ट माझ्यासाठी पारदर्शकता, दृढता आणि साधेपणा यांचे प्रतिक आहे.

तुमच्या जीवनात ही मुल्ये कुठे आणि किती उपयोगी आहेत हे #WhiteTshirtArmy चा वापर करत मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगा. मी तुम्हाला एक पांढरा टी शर्ट भेटवस्तू पाठवेन. सर्वांना खुप प्रेम.

भारत जोडो यात्रेदरम्यान टी-शर्ट चर्चेत आला होता

१९ जून १९७० रोजी जन्मलेले राहुल गांधी पाचवेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी २००४ मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि पहिली निवडणूक उत्तर प्रदेश राज्यातील अमेठीमधून लढवली. त्यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरुवात झाली. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल ४,०८० किलोमीटरचा प्रवास केला.

भारत जोडोयात्रे यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या पांढऱ्या टी शर्टची खूप चर्चा झाली होती. यात्रेच्या चौथ्या दिवशी भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर  "भारत देखो" असं लिहित राहुल गांधी यांचा  पांढरा टी- शर्ट घातलेला फोटो शेअर केला होता.  तर फोटोच्या बाजुला त्या टी-शर्टचा ब्रॅंड आणि त्याची किंमत दिली होती. तो टी-शर्ट बर्बरी ब्रॅंडचा होता. त्याची किंमत 41,257 रुपये दिली होती.

भाजपच्या या पोस्टनंतर काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते, "अरे तुम्ही घाबरलात का? भारत जोडो यात्रेमध्ये जमलेली गर्दी पाहून. मुद्याचं बोला, बेरोजगारी आणि महागाईवर बोला. बाकी  कपड्यांवर चर्चा करायची असेल तर मोदींच्या 10 लाख सूट आणि 1.5 लाखाच्या चष्म्यापर्यंत जावू शकते, सांगा काय करायचे?

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news