Gitanjali Angmo : विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती असती तर...; राहुल गाधींच्‍या आंदोलनाबाबत वांगचुक यांच्या पत्नी काय म्हणाल्या?

Gitanjali Angmo on Rahul Gandhi : पीएमओबाहेर झालेल्या आंदोलनात प्रामाणिकपणाचा स्पष्ट अभाव
Gitanjali Angmo on Rahul Gandhi
Gitanjali Angmo on Rahul Gandhi File Photo
Published on
Updated on

Gitanjali Angmo on Rahul Gandhi : 'नीट' (NEET) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान कार्यालयाबाहेर लक्षवेधी आंदोलन केले. या कृतीवर बेमुदत उपोषणाला सुरू असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधींना विद्यार्थ्यांबद्दल खरोखरच सहानुभूती असती तर त्यांनी जंतरमंतरवर जाऊन विद्यार्थ्यांसोबत उभे राहायला हवे होते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

PMO बाहेरील आंदोलनात प्रामाणिकपणाचा स्पष्ट अभाव

'इंडिया टुडे टीव्ही'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना गीतांजली अंगमो म्हणाल्या, "भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी चिंतित असलेल्या प्रत्येक व्यक्ती आणि पक्षासोबत आम्ही आहोत. मात्र, पीएमओबाहेर झालेल्या आंदोलनात प्रामाणिकपणाचा स्पष्ट अभाव दिसत होता. राहुल गांधी या मुद्द्याबाबत गंभीर असते, तर ते जंतरमंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांसोबत दिसले असते. आता लोकांची दिशाभूल करता येणार नाही, हा जागृत भारत आहे."'

Gitanjali Angmo on Rahul Gandhi
Sonam Wangchuk hunger strike : "... तर उपोषण मागे घेईन" ; सोनम वांगचुक यांचे केंद्र सरकारला पत्र

आप'चा राहुल गांधींवर निशाणा

आम आदमी पक्षाने (AAP) देखील गीतांजली अंगमो यांचा व्हिडिओ आपल्या 'एक्स' (X) हँडलवरून शेअर करत काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला. "पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर केलेले आंदोलन हे पूर्णपणे पूर्वनियोजित नाटक होते. विद्यार्थ्यांबाबतचे हेतू शुद्ध असते, तर राहुल गांधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले असते. जनता आता अशा राजकीय स्टंटबाजीला बळी पडणार नाही," अशी टीकाही 'आप'ने केली आहे.

Gitanjali Angmo on Rahul Gandhi
CJP Parliament March Police Attack: सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसाला ओढून घसटत नेलं... CJP ने केला दावा

१५० पेपर लीकच्या घटनांची चौकशी करू : जे. पी. नड्डा

दरम्यान, या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. "विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेल्या या गंभीर मुद्द्याचे राजकारण करून कोणीही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये," असे नड्डा म्हणाले. राहुल गांधी यांनी नमूद केलेल्या १५० पेपर लीकच्या घटनांवर बोलताना नड्डा म्हणाले की, सरकार या प्रत्येक मुद्द्याची गंभीर दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करेल आणि सत्य जनतेसमोर आणेल.काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या कार्यकाळात (UPA शासन) झालेल्या पेपर लीकच्या घटनांची मोठी यादीच नड्डा यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सादर केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news