मोठी बातमी: राहुल गांधी यांना बंगळूर न्यायालयाकडून मोठा दिलासा, मानहानी प्रकरणात जामीन मंजूर

राहुल गांधी. संग्रहित छायाचित्र
राहुल गांधी. संग्रहित छायाचित्र

पुढारी ऑनलाईन डेस्क: भाजपने दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात बंगळूर येथील विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना आज (दि.७ जून) जामीन मंजूर केला. भाजप नेत्यांवर खोट्या जाहिराती केल्याच्या आरोपातून हे प्रकरण घडले. डीके सुरेश यांच्या सुरक्षेवर राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

भाजपच्या कर्नाटक युनिटने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला उत्तर म्हणून राहुल गांधी बंगळूर येथील विशेष न्यायालयात आज (दि.७ जून) हजर झाले. दरम्यान झालेल्या सुनावणीत काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार राहुल गांधी यांना संबंधित प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या वर्षी, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर, काँग्रेसने एका जाहिरातीत राज्यातील तत्कालीन भाजप सरकारवर २०१९-२०२३ च्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. दरम्यान कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह भाजप नेत्यांविरोधात खोट्या जाहिराती दिल्याचा आरोप करत भाजपने मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान राहुल गांधी यांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरून ही "निंदनीय जाहिरात" पोस्ट केल्याचा आरोप भाजपने केला होता. यानंतर या प्रकरणात न्यायालयाने सध्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना 1 जून रोजी जामीन मंजूर केला होता. या प्रकरणी राहुल गांधी यांना ७ जून रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news