

Rahul Gandhi Claim he getting help who working ECI :
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेत गंभीर गोंधळ झाल्याचे आरोप केले आहेत. त्यांनी यावेळी तंत्रज्ञानाच्या मदतीनं वोटर डिलीशन कशाप्रकारे केलं जातं हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे पुरावे सादर करत सांगितलं. त्यांना दावा केला की निवडणूक आयोग अशा प्रकारे वोटर डिलीट करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे. कर्नाटक सीआयडीनं निवडणूक आयोगाला १८ पत्रं पाठवली मात्र त्यांच्याकडून उत्तर मिळालं नाही असा दावा केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्याला ही सर्व माहिती मिळवण्यात निवडणूक आयोगातीलच एका व्यक्तीनं मदत केल्याचा दावा देखील त्यांनी केला.
राहुल गांधी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, 'आम्हाला निवडणूक आयोगातील व्यक्तींकडूनच मदत मिळायला लागली आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की आम्हाला निवडणूक आयोगामधूनच आतली माहिती मिळत आहे. यापूर्वी असं होत नव्हतं. मात्र आता निवडणूक आयोगातील आतील माणसंच आम्हाला मदत करत आहेत. हे आता थांबणार नाही. भारतातील लोकं ही वोट चोरी मान्य करणार नाहीत. ज्यावेळी युवकांना मत चोरी होत आहे हे कळेल त्यावेळी ते सर्व ताकदीनिशी विरोध करतील.'
राहुल गांधी पुढे म्हणाले, 'प्रत्येक निवडणुकीत कोणीतरी कोणता तरी लोकांचा समुह भारतातील मतदार डिलीट करण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या जातसमुहातील लोकांची विशेषकरून विरोधकांना मतदान करणाऱ्या लोकांची नावं डिलीट केली जात आहेत. यात दलित, ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्याक यांचा जास्त समावेश आहे. हे सर्व लोकं सहसा विरोधकांना मतदान करतात.'
गांधी पुढं म्हणाले, 'आम्ही हे खूपवेळा ऐकलं आहे. आता हा घोटाळा शंभर टक्के पुराव्यानिशी सिद्ध झाला. मी इथं उभारून शंभर टक्के पुरावा असल्याशिवाय बोलणार नाही. माझं माझ्या देशावर, संविधानावर आणि लोकशाही प्रक्रियेवर प्रेम आहे. मी ही लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मी शंभर टक्के पुराव्यानिशीच बोलणार नाहीतर बोलणार नाही.'