Raghav Chadha Security: AAP मध्ये वाद वाढला? राघव चड्ढा यांची Z+ सुरक्षा काढली; आता दिल्ली पोलिसांनी...

Raghav Chadha Security News: राघव चड्ढा यांची Z+ सुरक्षा पंजाब पोलिसांनी काढून घेतली आहे. AAP मधील वाढत्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो.
Raghav Chadha Security
Raghav Chadha SecurityPudhari
Published on
Updated on

Raghav Chadha Security News: आम आदमी पक्षात (AAP) अंतर्गत मतभेद वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड समोर आली आहे. पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना पंजाब पोलिसांनी दिलेली Z+ सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

सुरक्षा का काढली?

राघव चड्ढा यांना पंजाब सरकारकडून Z+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र गेल्या आठवड्यात ही सुरक्षा अचानक हटवण्यात आली. आता केंद्र सरकारकडून त्यांना सुरक्षा दिली जाणार असून, तोपर्यंत दिल्ली पोलिस त्यांची सुरक्षा सांभाळणार आहेत.

AAP मध्ये वाढले मतभेद

या निर्णयाची वेळ पाहता, AAP मधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचं स्पष्ट होत आहे. अलीकडेच राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरूनही हटवण्यात आलं होतं. यामुळे पक्षातील त्यांची भूमिका आणि स्थान यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Raghav Chadha Security
MGNREGA No Wage Hike: मनरेगाच्या कामगारांना मोठा झटका; यावर्षी वेतनवाढ होणार नाही, काय आहे कारण?

पक्षाचे आरोप आणि चड्ढांचा पलटवार

AAP च्या काही नेत्यांनी चड्ढा यांच्यावर आरोप केला की, ते संसदेत पंजाबच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेत नाहीत आणि जास्त वेळ जनसंपर्कात घालवतात. मात्र चड्ढा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, संसदेत आपली भूमिका लोकांचे प्रश्न मांडण्याची आहे.

सोशल मीडियावरही प्रतिक्रिया

पद काढून घेतल्यानंतर राघव चड्ढा सतत सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहेत. त्यांनी “Voice Raised, Price Paid” या शीर्षकाखाली एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्यांनी संसदेत मांडलेल्या मुद्द्यांची झलक दाखवली. तसेच, “Never Outshine the Master” या पुस्तकातील काहीओळी शेअर करून त्यांनी अप्रत्यक्षपणे अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केल्याचं मानलं जात आहे.

Raghav Chadha Security
Lok Sabha Special Session |लोकसभा सदस्य संख्या ८५० वर जाणार! केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचनेसह ३ विधेयके आणण्याच्या तयारीत

पुढे काय?

सध्या हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. राघव चड्ढा शांत बसण्याच्या मूडमध्ये नसून, ते सातत्याने आपली बाजू मांडताना दिसत आहेत. AAP मध्ये अंतर्गत तणाव वाढत असताना, राघव चड्ढा यांची सुरक्षा काढणे ही मोठी राजकीय घटना मानली जात आहे. पुढील काही दिवसांत या वादाला कोणतं वळण लागतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news