Accident: सौंदत्ती यल्लम्माच्या दर्शनासाठी निघालेल्या पुण्याच्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात चिमुकल्यासह तिघे ठार

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील मालदिन्नी क्रॉसजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन पुण्याच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Accident
AccidentFile Photo
Published on: 
Updated on: 

कर्नाटक : काशिनाथ सुळकुडे

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील मालदिन्नी क्रॉसजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन पुण्याच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला असून, इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

ओंकार चंद्रशेखर मांडरे (वय २६), रेश्मा मांडरे (वय ३२) आणि देवांश मांडरे (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. पुण्यातील मांडरे कुटुंब सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी कारने जात होते. प्रवासादरम्यान यरगट्टीहून गोकाकच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा पूर्णपणे चुराडा झाला आणि आतील तिघांनी जागीच प्राण सोडले.

Accident
Marleshwar Rockfall Accident|मार्लेश्वरमधील चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजीपणाचाच बळी

या अपघातात श्रीकांत मांडरे, वंदना मांडरे आणि हर्षदा मांडरे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; फर्दापूरवर शोककळा

दुसरी एक घटना, सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. १४) घडली. शेख अब्दुल रहीम शेख अब्दुल रशीद आणि शेख हमीद शेख अब्दुल रशीद अशी मृत भावांची नावे आहेत. विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे धाकटे बंधू शेख मुक्तार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच पुन्हा दोन भावांचा मृत्यू झाल्याने फर्दापूरवर शोककळा पसरली आहे.

शेख अब्दुल रहीम हे अजिंठा लेणी परिसरात पर्यटन व्यवसायाशी संबंधित होते. औपचारिक शिक्षण घेतलेले नसतानाही देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या संपर्कातून त्यांनी तब्बल १४ देशांच्या भाषा आत्मसात केल्या होत्या. जपानी, कोरियन, फ्रेंच आणि इंग्रजीसह विविध भाषांमध्ये पर्यटकांशी संवाद साधण्याचे कौशल्य त्यांनी मिळवले होते. त्यामुळे ते परिसरात 'रहीम गाईड' म्हणून परिचित होते. जिद्द आणि अनुभवाच्या जोरावर मिळवलेल्या त्यांच्या भाषाज्ञानाचे अनेकांना कौतुक वाटत असे. एकाच कुटुंबातील दोन भावांचा अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू झाल्याने नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांना मोठा धक्का बसला. दोन महिन्यांत तीन भावांचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Accident
Karad Leopard Accident : कराडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.