Puducherry Election Results : पुदुच्चेरीत पुन्हा 'रंगा'स्वामी; भाजप-एनडीएचा दणदणीत विजय!

काँग्रेसप्रणित आघाडी संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत आणि विस्कळीत असल्याचे या ठिकाणी जाणवले.
Puducherry Election Results : पुदुच्चेरीत पुन्हा 'रंगा'स्वामी; भाजप-एनडीएचा दणदणीत विजय!
Published on
Updated on

Puducherry election results BJP NDA victory

नवी दिल्ली : पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला. यंदाच्या निवडणुकीत इथे पुन्हा सत्ता मिळवणे हा केवळ राजकीय योगायोग नसून विविध घटकांच्या एकत्रीकरणातून आलेले परिणाम आहेत. भाजपची एआयएनआरसी सोबत युती पुन्हा एकदा मजबुतीने पुढे आली आहे. विद्यमान मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांची स्थानिक पातळीवरील विश्वासार्ह प्रतिमा, साधी शैली आणि जनसंपर्क यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना होती तर भाजपने संघटनात्मक पातळीवर प्रभावी प्रचार यंत्रणा उभी केली. स्थानिक नेतृत्वाला राष्ट्रीय पाठबळ दिले.

पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी सुसंगत सरकार असेल तर अधिक निधी, विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधा मिळतील, असा विचार मतदारांमध्ये पेरण्यात एनडीएला यश आले. मागील कार्यकाळात आघाडी सरकारने तुलनेने स्थिर कारभार दिल्याने सत्ताविरोधी वातावरण निर्माण झाले नाही, जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. देशात अनेक मुद्दे असताना स्थानिक मुद्द्यांवर एनडीएने ही निवडणूक खेळवली. त्यामुळे स्वाभाविकच स्थानिक मतदारांना एनडीए जवळचा पर्याय वाटला.

दुसरीकडे काँग्रेसप्रणित आघाडी संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत आणि विस्कळीत असल्याचे या ठिकाणी जाणवले. स्थानिक पातळीवर प्रभावी आणि सर्वमान्य नेतृत्वाचा अभाव, अंतर्गत समन्वयातील त्रुटी धोरणात्मक स्पष्टतेचा अभाव यामुळे मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात त्यांना यश आले नाही. प्रचारातही ठोस भूमिका दिसली नाही. आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी प्रचाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील आता स्थानिक पातळीवडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news