Public Sector Banks Mergers Fact Check: देशातील ९ सरकारी बँकांचे होणार विलिनीकरण... व्हायरल 'डॉक्युमेंट' चे काय आहे सत्य?

Public Sector Banks Mergers Fact Check
Public Sector Banks Mergers Fact Checkpudhari
Published on
Updated on

Public Sector Banks Mergers Fact Check: सोशल मीडियावर सध्या एक डॉक्युमेंट व्हायरल होत आहे. या डॉक्युमेंटमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांचे विलिनीकरण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळं जनमानसात एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यावर आता केंद्र सरकारने खुसाला केला असून हे डॉक्युमेंट फेक असून देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरणाची माहिती खोटी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Public Sector Banks Mergers Fact Check
Banking sector jobs| शुभ वार्ता! चांगला पगार, पदांची संख्याही वाढली; ITत मंदी असताना 2026 मध्ये बँकिंगमध्ये नोकरीची संधी

केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

पीआयबीने आपल्या पीआयबी फॅक्ट चेकच्या एक्स हँडलवरून याची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी केंद्र सरकारच्या अर्थ विभागानं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून अशा प्रकारचे कोणतेही गॅझेट प्रसिद्ध केलेलं नाही.

दरम्यान, केंद्र सरकारने लोकांनी अशा प्रकारच्या माहितीची खात्रीलायक सूत्रांकडून आणि अधिकृत ठिकाणांवरून खातरजामा करून घेतली पाहिजे आणि त्यानंतर ती शेअर केली पाहिजे असं सांगितलं. या पोस्टमध्ये पीआयबीने जर कोणाला असा संशयास्पद दावा केल्याचे आढळून आले तर त्यांनी भारत सरकारला याचा रिपोर्ट केलं पाहिजे असं देखील सांगितलं. त्यांनी अशा प्रकारच्या दाव्यांची पीआयबीच्या एक्स हँडलवरून किंवा मोबाईल क्रमांक 91 8799711259 वरून खातरजमा केली जाऊ शकते अशी सुचना देखील केली. याचबरोबर तुम्ही factcheck@pib.gov.in. या इमेल आयडीवर देखील मेल करून माहिती खरी आहे की खोटी हे जाणून घेऊ शकता.

Public Sector Banks Mergers Fact Check
Union Budget 2026 banking Sector | गुंतवणूकदारांना संधी ; बँकिंग आणि बाँड मार्केटमध्ये सुधारणांचा मार्ग मोकळा

PIB फॅक्ट चेक काय म्हणते?

पीआयबीने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून व्हायरल होणारे गॅझेट डॉक्युमेंट फेक असल्याचं सांगितलं. त्यांनी ट्विट केलं की, 'हे डॉक्युमेंट फेक असून ते अर्थ खात्याच्या अधिकृत हँडल FinMinIndia वरून इश्यू झालेलं नाहीये. प्रत्येक वेळी अशा प्रकारची माहिती शेअर करण्यापूर्वी अधिकृत आणि खात्रीलायक सूत्रांकडून तपासून घ्या.'

या पोस्टमध्ये पीआयबी पुढे म्हणते, 'या व्हायरल होत असलेल्या डॉक्युमेंटवर हे डॉक्युमेंट अर्थ खात्यानं इश्यू केलं असल्याचा दावा केला आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलिनीकरणाबाबतचे नोटिफिकेशन काढले असल्याचा दावा देखील त्यात करण्यात आला आहे. हा दावा खोट्या गॅझेटद्वारे करण्यात आला आहे.

Public Sector Banks Mergers Fact Check
Ahilyanagr District Bank Election: जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार यादीकडे लक्ष; आजपासून राजकीय समीकरणांना वेग!

कोणत्या बँका मर्ज होणार असा दावा केला गेला?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या गॅझेटमध्ये इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि संट्रल बँक ऑफ इंडिया या बँक एसबीआय बँकेत विलीन होणार आहेत आणि एसबीआयचे नाव देखील एसबीआय ग्रुप असं होणार आहे असा देखील दावा करण्यात आला आहे.

त्याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, पंजाब आणि सिंध बँक यांना पंजाब नॅशनल बँकेत मर्ज केलं जाणार आहे. तसेच कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युको बँक या बाँका बँक ऑफ बडोदामध्ये मर्ज होणार आहे असा दावा करण्यात आला होता. मात्र पीआयबीने हा दावा खोटा असल्याचं अन् असं कोणतेही गॅझेट अर्थ खात्यानं इश्यू केलं नसल्याचं सांगितलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news