UP Crime News | ११ महिलांची हत्या करणाऱ्या सायको सीरियल किलरला अटक

यूपीतील बरेलीत कारवाई; ६ महिलांच्या खुनाची कबुली
Mumbai News
११ महिलांची हत्या करणाऱ्या सायको सीरियल किलरला अटकFile Photo
Published on
Updated on

बरेली (यूपी) :

सावत्र आईने माझा फार छळ केला. लग्नानंतर माझी पत्नीही मला सोडून गेली. मला महिलांचा तिरस्कारच होता. त्यांना मारण्यात मला मोठीच मजा वाटायची, असा खळबळजनक जबाब सायको सीरियल किलर कुलदीप याने दिला.

Mumbai News
Manoj Jarange | मराठ्यांना आरक्षण मिळू नये हीच सरकारची भूमिका

बरेली जिल्ह्यातील शाही आणि शिशगड परिसरातील ११ महिलांची एकापाठोपाठ हत्या झाली होती. यातील ६ खुनांची कबुली कुलदीपने दिली. आहे. पोलिसांनी शुक्रवारी त्याला माध्यमांसमोर हजर केले.

कुलदीप हा निर्जन ठिकाणी महिलेचीच साडी किंवा दुपट्टा वापरून गळा आवळून महिलेची हत्या करायचा. आठवण म्हणून तिच्याकडचे काहीतरी (मतदार ओळखपत्र, विळा, ब्लाऊजच्या कापडाचा तुकडा) काढून घेऊन जायचा.

तो नवाबगंजलगतच्या बकरगंज समुआ गावचा रहिवासी आहे. गेल्या १३ महिन्यांत बरेली परिसरात ११ महिलांची हत्या झाली आहे. मारेकरी कोण, ते मात्र उलगडत नव्हते. पोलिसांनी अखेर याकडे सीरियल किलिंग म्हणून पाहिले आणि तपासाला दिशा दिली. तीनच दिवसांपूर्वी पोलिसांनी संशयिताची तीन रेखाचित्रे जारी केली होती. पोलिसांना अनेक फोन आले. माहिती देणाऱ्याची खातरजमा झाल्यानंतर कुलदीपला अटक करण्यात आली.

हा ऐवज कुलदीपकडून जप्त

  • आनंदपूरच्या मृत प्रेमवतीचा विळा

  • कुलचा गावातील मृत धनवती यांचे आधार कार्ड

  • लखीमपूर गावातील मृत महमुदनच्या दुपट्ट्याचे कापड.

काय सांगितले सीरियल किलरने ?

माझी बायको मला सोडून गेल्यानंतर मला ड्रग्जचे व्यसन लागले. इकडे तिकडे फिरू लागलो. मी कोणत्याही स्त्रीकडे साधे पाहिले तरी संतापात माझे रक्त उसळायला लागायचे. गळा संपूर्ण आवळला की मी फास तसाच सोडत नसे. डाव्या बाजूला आवर्जून गाठ घालत असे, हे कुलदीपने पोलिसांना सांगितले.

  • पित्याने केले होते दुसरे लग्न; सावत्र आईचा जाच

  • स्वतःची पत्नीही सोडून गेल्याने महिलांबद्दल घृणा

  • सीरियल किलरचे पोलिस चौकशीतील जबाब

  • गुन्ह्याच्या उलगड्यात मुंबई पोलिस दलातील तज्ज्ञांची मदत

तीन महिन्यांत दीडशे ठिकाणी छापे टाकले

  • मुंबईतील अशाच स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पोलिस दलातील तज्ज्ञांची मदत घेतली. शेतमजूर महिलांचे प्रबोधन केले.

  • ३० गावांतील मतदार ओळखपत्रांची तपासणी केली.

  • ज्या ठिकाणी अलीकडचा खून झाला, तेथून २५ किलोमीटरची त्रिज्या तयार केली आणि परिसरातील १५०० सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली.

  • परिसरात ६०० नवीन कॅमेरेही बसवण्यात आले.

Mumbai News
PM Narendra Modi | सोशल मीडियावर तिरंगा प्रोफाईल पिक्चर बनवा; पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन

या सहा खुनांची कबुली

  • ३ जुलै २०२४ : अनिता देवी (वय ४६, रा. हौशपूर)

  • २६ नोव्हेंबर २०२३ : जगदीशपूरच्या उर्मिला (वय ५५)

  • २० नोव्हेंबर २०२३ : खरसैनी गावच्या दुलारा देवी (वय ६५)

  • ३१ ऑक्टोबर २०२३ : लखीमपूर येथील महमुदन (वय ६५)

  • १७ जून २०२३ : कुलचा येथील धनवती (वय ४३)

  • १ जुलै २०२३ : आनंदपूरच्या प्रेमवती (वय ५५)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news