प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा प्रसंग : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा प्रसंग : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उत्तर टोकापासून दक्षिण टोकापर्यंत आणि पूूर्वेच्या सीमेपासून पश्चिमेच्या सागर किनार्‍यांपर्यंत विविधतेने नटलेल्या भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी नवीन संसद भवनाचे उद्घाटन हा अभिमानाचा आणि अतुलनीय आनंदाचा क्षण आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

नवीन संसद भवनाच्या वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी उपस्थित खासदारांना संबोधित केले. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे शुभेच्छा संदेश त्यांनी वाचून दाखवले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संदेश सिंह यांनी वाचून दाखवला. राष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणतात की, नवीन संसद भवनाचे उद्घाटन हा भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरात नोंद होणारा क्षण आहे. उत्तर टोकापासून दक्षिण टोकापर्यंत आणि पूूर्वेच्या सीमेपासून पश्चिमेच्या सागर किनार्‍यांपर्यंत विविधतेने नटलेल्या भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी नवीन संसद भवनाचे उद्घाटन हा अभिमानाचा आणि अतुलनीय आनंदाचा क्षण आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, भारतीय लोकशाहीच्या अभूतपूर्व विकास यात्रेच्या या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षणाला सार्‍या देशाचे अभिनंदन करताना मनापासून आनंद होत आहे. अमृतकाळात निर्माण करण्यात आलेले हे संसद भवन आपल्या विकासाचे, प्रगतीचे साक्षीदार राहील असा विश्वास आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news