

नवी दिल्ली : 'मत चोरी स्वाक्षरी' मोहिमेत सामील व्हा, असे आवाहन काँग्रेस नेत्या खा. प्रियांका गांधी यांनी देशातील जनतेला केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रियांका गांधी यांनी 'मत चोरी' मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, जसे प्रत्येक मत महत्त्वाचे असते, तशीच प्रत्येक स्वाक्षरी महत्त्वाची असते. लोकशाहीसाठी, आपल्या संवैधानिक अधिकारांसाठी प्रत्येकजण महत्त्वाचे असतो. आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या मतदानाच्या अधिकारासाठी आणि आपल्या संवैधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी लढत आहोत. 'एक माणूस, एक मत' या लोकशाही तत्त्वाचे रक्षण करण्यासाठी तुमचा पाठिंबा दर्शवा आणि 'मत चोरी स्वाक्षरी' मोहिमेत सामील व्हा, असेही त्या म्हणाल्या. एका व्हिडिओद्वारे आवाहन प्रियंका गांधांनी हे आवाहन केले
दरम्यान, गुरुवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर लोकशाही नष्ट करणाऱ्या मत चोरांना संरक्षण दिल्याचा आरोप केला. त्यावर राहुल गांधी यांचे आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले.