नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील 51 हजार पदे भरण्यासाठीचा रोजगार मेळावा मंगळवारी (दि. 26) होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले जाणार आहे.
दरम्यान, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने मात्र मोदी सरकारवर तरुणांमध्ये सर्वाधिक बेरोजगारी वाढविल्याचा आरोप केला आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नवनियुक्त उमेदवारांना 51,000 नियुक्ती पत्रांचे वितरण करतील. त्यासाठी देशभरात 46 ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत.
संबधित बातम्या :