

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे वर्ष सर्वांना नवीन संधी, यश आणि अनंत आनंद घेऊन येवो. सर्वांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो, असे शुभेच्छा संदेशमध्ये मोदींनी लिहीले आहे.
वर्षभरातील चांगल्या आठवणी मनात साठवत दुःखद घटना बाजूला सारून, सर्वांनी मंगळवारी २०२४ ला मावळत्या सूर्याच्या साक्षीने निरोप दिला आणि मग रात्रभर चाललेल्या जल्लोषात २०२५ या नववर्षाचे स्वागत केले.