Pride Month : व्हॉट्सॲपनं एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायासाठी घेतला ‘हा’ निर्णय…

व्हॉट्सॲपनं एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायासाठी घेतला ‘हा’ निर्णय…
Pride Month
व्हॉट्सॲपनं एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायासाठी घेतला ‘हा’ निर्णय…Pride Month
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्सॲप नेहमी आपल्या युजरसाठी काही ना काही नवे फिचर आणत असते. तेवढेच ते सामाजिक भावनेने इतर गोष्टीतही अग्रसेर असते. संपूर्ण जून महिना हा प्राइड मंथ (Pride Month) म्हणून साजरा केला जातो. भारतासह हा जगभरात हा महिना प्राइड मंथ म्हणून साजरा केला जातो. नुकतेच व्हॉट्सॲपने प्राइड मंथच्या पार्श्वभूमीवर एलजीबीटीक्यू (LGBTQ+) समुदायासाठी ट्विट करत एक घोषणा केली आहे.

Pride Month : आम्ही एलजीबीटीक्यू कलाकारांच्या कलेला हायलाइट करू

यामध्ये लिहिले आहे की, प्राइड मंथच्या शुभेच्छा, एलजीबीटीक्यू (LGBTQ+) समुदायाला समर्थन देण्यासाठी, आम्ही एलजीबीटीक्यू कलाकारांना हायलाइट करणार आहोत आणि त्यांचे कार्य महिनाभर साजरे करू. प्रत्येक आठवड्यात, आम्ही एलजीबीटीक्यू कलाकारांनी त्यांच्या जीवनातील अनुभव प्रेरित होऊन डिझाइन केलेली कला शेअर करु. तुम्हाला त्यांची कला जतन करण्याची आणि WhatsApp Background म्हणून वापरण्याची संधी मिळेल. या आठवड्याचा कलाकार म्हणून Twitter user name – @marmarmaremoto असणार आहे. व्हॉट्सॲपने एलजीबीटीक्यू कलाकारांच्या काही कलाकृती आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केल्या आहेत.

Pride Month : जगातील पहिला प्राइड मंथ

१९६९ जुनमध्ये न्यूयॉर्कमधील एलजीबीटीक्यू समुदायाच्या लोकांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर हल्ले करुन त्यांना मारहाण करुन तुरुंगात टाकले. याची पार्श्वभूमी अशी की, २८ जून १९६९ रोजी, न्यूयॉर्क मध्ये एलजीबीटीक्यू समुदाय परवान्याशिवाय बार चालवत आहे. हे कारण सांगून त्यांनी छापा टाकला. या अगोदरही छापासत्र सुरु होतं. एलजीबीटीक्यू समुदायाला दारू देण्यावर बंदी होती. २८ जूनच्या छाप्याच्या विरोधात एलजीबीटीक्यू समुदायासह इतर लोकांनी एकत्र येवून विरोध केला. या सहभागी लोकांना पोलिसांनी पकडून तुरुंगात टाकले. या आंदोलनाला तेव्हापासून स्टोनवॉल दंगल, स्टोनवॉल उठाव म्हणू लागले. या घटनेनंतर अमेरिकेत आणि सुरु झाला त्यानंतर अमेरित जून हा प्राइड मंथ (Pride Month) म्हणून साजरा केला जावू लागला. हळू-हळू देशभरात प्राइड मंथ साजरा होवू लागला.

यावर्षी झाली भारतात प्राइड परेड

कोलकत्ता येथे २ जुलै १९९९ रोजी भारतातील पहिली प्राइड परेड आयोजित केली होती. या प्राइडला तेव्त् रेनबो प्राईड वॉक असे म्हटले गेले. या परेडमध्ये फक्त १५ जण सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या परेडमध्ये एकही महिला सहभागी नव्हती. तेव्हापासून भारतातील विवीध शहरात उदा. भुवनेश्वर, भोपाळ, सुरत, हैदराबाद, दिल्ली, मुंबई, बंगळूर, चंदीगड शहरात परेड आयोजित केली जावू लागली.

LGBTQ + म्हणजे काय?

बऱ्याच जणांना एलजीबीटीक्यू (LGBTQ) म्हणजे काय हा प्रश्न पडतो. तर हा एक शॉर्टफॉर्म आहे. एलजीबीटीक्यू (LGBTQ) मधील एल-लेस्बियन (L- Lesbian), जी-गे (G-Gay), बी-बायसेक्शुअल (B-Bisexual), टी-ट्रान्सजेंडर(T-Transgender), क्यू- क्विअर (Q-Queer) तर एलजीबीटीक्यूच्या नंतर प्लस ( + ) आहे हे पॅनसेक्सुअल, टू स्पिरीट, अलैंगिक आणि सहयोगी यासह इतर जेंडर दर्शवतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news