LPG Gas Crime News | गॅस बुकिंगचे पैसे जुगारात उडवले, वादानंतर पतीने केली गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या

LPG Gas Crime News | विटांनी मारहाण, नराधम पती गजाआड
LPG Gas Crime News
प्रातिनिधिक छायाचित्र.pudhari photo.
Published on
Updated on

LPG Gas Crime News

बेगुसराय : एकीकडे अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या तणावामुळे इंधनाच्या किमती आणि उपलब्धतेवरून जगभरात चिंतेचे वातावरण असताना, दुसरीकडे घरोघरी जीवनावश्यक वस्तूंवरून होणारे वाद आता हिंसक वळण घेऊ लागले आहेत. घरगुती गॅस सिलिंडर रिफिल बुकिंगसाठीच्या वादातून बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. गॅस बुकिंगसाठी दिलेले पैसे पतीने जुगारात पैसे उडवल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर २१ वर्षीय गर्भवती पत्नीची विटांनी ठेचून निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

एलपीजी सिलिंडरसाठीचे पैसे जुगारात उडवले

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने पतीला एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी पैसे दिले होते. मात्र भरवण्यासाठी दिलेले पैसे त्याने जुगारात उडवले. कुटुंबीयांनी दावा केला आहे की, राज जुगाराच्या आहारी गेला आहे. त्यांच्या आरोपानुसार, लक्ष्मीने १० दिवसांपूर्वी त्याला एलपीजी सिलिंडर भरवण्यासाठी १,००० रुपये दिले होते, परंतु त्याने ते पैसे जुगारात खर्च केले.

LPG Gas Crime News
LPG Shortage: गॅसटंचाईमुळे पुन्हा पेटल्या मातीच्या चुली; गावच्या कारागिरांना सुगीचे दिवस

पत्नीने जाब विचारल्यानंतर पतीने निर्घृण कृत्य

जुगारात पैसे उडविल्याचा जाब पत्नीने विचारला. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी आरोपी राजने लक्ष्मीला विटांनी मारले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. पत्नीला राजने स्थानिक रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृत लक्ष्मी कुमारी ही अडीच वर्षांच्या मुलाची आई होती आणि ती दुसऱ्यांदा गरोदर होती. तिचे लग्न चार वर्षांपूर्वी राज चौधरी याच्याशी झाले होते. या प्रकरणी पती राजला अटक करण्यात आली आहे.

LPG Gas Crime News
LPG Crisis: हजाराचा सिलिंडर परवडला... गॅसच्या तुलनेत चूल महागच! एका शेणी मागचं गणित परवडेना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news