pre wedding shoot controversy | प्री-वेडिंग शूट दरम्यान राडा: मंदिरात बूट घातल्याने फोटोग्राफर्सना बेदम मारहाण

pre wedding shoot controversy |कर्नाटकातील बेट्टाडा भैरवेश्वर मंदिर परिसरातील प्रकार, मारहाण प्रकरणी सात जणांना अटक
pre wedding shoot controversy
सकलेशपूर येथील 'बेट्टाडा भैरवेश्वर' मंदिरात प्री-वेडिंग शूट दरम्यान मोठा वाद झाला. स्थानिकांनी व्यावसायिक फोटोग्राफर्सना बेदम मारहाण केली.social media.
Published on
Updated on

pre wedding shoot controversy

सकलेशपूर : कर्नाटकातील सकलेशपूर येथील 'बेट्टाडा भैरवेश्वर' मंदिरात प्री-वेडिंग शूट दरम्यान मोठा वाद झाला. स्थानिकांनी व्यावसायिक फोटोग्राफर्सना बेदम मारहाण केली. मंदिर परिसरात पादत्राणे घालून वावरल्यामुळे हा वाद झाला. मारहाण प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

मंदिरात पादत्राणे घातल्यावरून वाद

हासन जिल्ह्यातील सकलेशपूर तालुक्यातील डोंगररांगांमध्ये वसलेले ऐतिहासिक बेट्टाडा भैरवेश्वर मंदिर हे प्री-वेडिंग शूटसाठी प्रसिद्‍ध ठिकाणे आहे. शेजारच्या मुडिगेरे तालुक्यातील काही तरुणांनी जेव्हा एका जोडप्यासह त्यांच्या फोटोग्राफी टीमला पाहिले, तेव्हा स्‍थानिक संतप्‍त झाले. फोटोग्राफर्स मंदिर परिसरात पादत्राणे घालून फिरत होते. पावित्र्याचे उल्लंघन झाल्‍याच्‍या कारणावरून स्थानिकांनी आक्षेप घेतला. सुरुवातीला झालेली शाब्दिक चकमक अल्पावधीतच हातापाईवर आली.

pre wedding shoot controversy
Ashok Kharat Controversy: आर्थिक गुंता अन्‌‍ विश्वासघात ठरला भोंदू खरातचा कर्दनकाळ

फोटोग्राफर्स रुग्णालयात दाखल

हा वाद इतका विकोपाला गेला की स्थानिकांनी फोटोग्राफर्सवर हल्ला चढवला. नवी आणि नंदन अशी मारहाण झालेल्या फोटोग्राफर्सची नावे आहेत. हल्लेखोरांनी व्यावसायिक साहित्याचीही तोडफोड केली.एका कॅमेऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जखमी फोटोग्राफर्सना तातडीने उपचारासाठी सकलेशपूर तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सकलेशपूर ग्रामीण पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

pre wedding shoot controversy
Monalisa Controversy: पहिला चित्रपट आहे म्हणून बलात्कार करणार का...? मोनालिसाचा थेट सवाल, सनोज मिश्रांवर केले गंभीर आरोप

फोटोग्राफीबाबत मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची मागणी

घटनेची माहिती मिळताच सकलेशपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पीडितांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सात आरोपींना अटक केली आहे. सकलेशपूर हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असले तरी, भविष्यात असे वाद टाळण्यासाठी संवेदनशील धार्मिक स्थळांवर फोटोग्राफीबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता की धार्मिक भावना दुखावल्यामुळे अचानक घडलेला प्रकार होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

pre wedding shoot controversy
Smriti Mandhana: 'आम्हाला यात ओढू नका...' स्मृती मंधानाच्या लग्नाबाबत कोरिओग्राफरने सोडले मौन; केला मोठा खुलासा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news