Police Wife FIR Husband: ज्या पतीनं शिकवून पोलीस बनवलं, त्याच्याविरूद्धच FIR... काय आहे पायल राणी अन् गुलशनची कहानी?

दुसरीकडं आरोपी पतीने दावा केला आहे की त्यानं कष्टानं पत्नीला शिकवलं आणि पोलीस बनवलं. आता लग्नानंतर दोन वर्षांनी खोट्या केसमध्ये त्याला अडकवलं जात आहे.
Police Wife FIR Husband
Police Wife FIR Husbandpudhari photo
Published on
Updated on

Police Wife FIR Husband Dowery Case: पायल राणी या महिला सब इन्स्पेक्टर यांनी आपला पती गुलशन आणि त्यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांविरूद्ध हुंड्यावरून छळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी FIR दाखल केली आहे. पायल राणी यांनी २ डिसेंबर २०२२ रोजी लग्न झाल्यानंतर सासरकडच्या लोकांनी १० लाख रूपये आणि गाडीची मागणी करत शारीरिक आणि मानसिक छळ केला.

पती आणि सासू सासऱ्यांनी त्यांची मागणी पूर्ण झाली नाही तर अॅसीड फेकण्याची देखील धमकी दिली होती. दुसरीकडं आरोपी पतीने दावा केला आहे की त्यानं कष्टानं पत्नीला शिकवलं आणि पोलीस बनवलं. आता लग्नानंतर दोन वर्षांनी खोट्या केसमध्ये त्याला अडकवलं जात आहे.

Police Wife FIR Husband
Goa Cyber Crime News | वधू शोधण्याचा प्रयत्न ठरला महागात; 58 वर्षीय व्यक्तीला 1.41 कोटींचा गंडा

अॅसीड हल्ला करण्याची धमकी

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये पोस्टिंग असलेल्या पायल राणी यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, तिच्या माहेरकडच्यांनी लग्नात त्यांच्या कुवतीप्रमाणं हुंडा दिला होता. तरीसुद्धा पती गुलशन आणि सासरकडच्या लोकांचे समाधान झाले नाही. अजून हुंड्यासाठी या लोकांनी पायल राणी यांना मारहाण केल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे.

पायल यांच्या म्हणण्यानुसार सासरच्या मंडळींनी त्यांच्यावर अॅसीड हल्ला करण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे पायल या त्यांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत. आता पोलिसांनी पायल यांच्या मारहाण, धमकी आणि हुंड्यासाठी छळ या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.

Police Wife FIR Husband
Crime News: ऑटोवालीची मर्डर मिस्ट्री... 'झाशी'मध्ये पहिल्या रिक्षाचालक महिलेची गोळ्या झाडून हत्या, कारण धक्कादायक

पतीचा वेगळाच दावा

पायल राणी यांनी हुंड्यावरून छळ झाल्याचा आरोप केला असला तरी पती गुलशन यांनी वेगळाच दावा केला आहे. त्यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावत थेट एसपींकडेच न्यायासाठी धाव घेतली आहे. गुलशन यांनी सांगितलं की पायल राणी त्यांच्या परिचय हा २०१६ पासूनचा आहे. ते एकमेकांना ओळखत होते. २०२१ मध्ये त्यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर २०२२ मध्ये समाजाच्या रिती रिवाजाप्रमाणं त्यांचं लग्न लावण्यात आलं.

दरम्यान, गुलशनने दावा केला की त्यानं कष्ट करून पायलला शिकवलं. त्यानंतर तिला सब इन्स्पेक्टर होण्यास देखील मदत केली. पतीचा आरोप आहे की पद मिळाल्यानंतर आता पत्नीने त्यांच्यावरच आणि निर्दोष कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल केला आहे.

Police Wife FIR Husband
crime news | नराधम मुलाने उद्‍ध्वस्त केलं हसतं-खेळतं कुटुंब; आईसह भावंडांची निर्घृण हत्या करून स्वतःच गाठलं पोलीस स्टेशन!

एसपींनी दिलं आश्वासन

हापुडचे एसपी कुवंग ज्ञानंजय सिंह यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. पोलीस दोन्हीकडच्यांची बाजू ऐकून घेऊन त्याची नोंद करत आहे. पुरावे गोळा केले जात आहेत.

एसपींनी पती गुलशन यांची देखील बाजू ऐकून घेतली जाईल. संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास केला जाईल. तपासानंतरच पुढची कारवाई केली जाईल असं सांगितलं. सध्याच्या घडीला पायल राणी आणि गुलशन यांचे हे प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे. आता काय खरं काय खोटं कोणाचा दावा खरा हे तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news