.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क :
आज वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत मुकेश अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा होत असून, या विवाहसोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. Ambani Wedding
गेले काही दिवस चर्चेत असलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याला पंतप्रधान नरेंद्रही उपस्थित राहतील. मुकेश अंबानी यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना वैयक्तिकरित्या निमंत्रण दिले होते. पण राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर प्रसिद्ध राजकारणी उपस्थित राहणार आहेत. या सर्वांना अंबानींनी वैयक्तिकरित्या आमंत्रित केले आहे.
अंबानी घरच्या या सोहळ्याला शुक्रवारी देश-विदेशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, उद्योगपती, बडे व्यापारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि रूपेरी दुनियेतील चित्रतारे एकच गर्दी करणार आहेत. एका अंदाजानुसार, विमानांची प्रचंड वर्दळ असणार्या मुंबईत या विवाह सोहळ्यासाठी शंभर खासगी विमाने उतरणार असून, तीन फाल्कन जेट देखील दाखल होणार आहेत. नामवंत पाहुण्यांची यादी साधारण 2,500 जणांची आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनकड गुरुवारीच मुंबईत विधिमंडळाच्या कार्यक्रमानिमित्त आले. ते आता अंबानींच्या नवदाम्पत्यावर अक्षता टाकूनच दिल्लीला परततील.
देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहणार असून, त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव आदीही मुंबईत डेरेदाखल होत आहेत.
गेल्या 1 मार्चला अनंत-राधिकाच्या विवाहपूर्व सोहळ्यांना सुरुवात झाली आणि प्रत्येक सोहळा जगभर चर्चेचा विषय ठरला. गुजरातच्या जामनगरला म्हणजे अंबानी घराण्याच्या मूळ शहरापासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली. या पहिल्याच कार्यक्रमाला फेसबुकवाले मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस्, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची ज्येष्ठ कन्या इव्हांका यांच्यासह जागतिक कीर्तीचे 1200 पाहुणे उपस्थित होते. या कार्यक्रमात गाण्या-नाचण्याचे पॉप सिंगर रिहानाने 72 कोटी रुपये बिदागी घेतल्याचे म्हटले जाते.