

PM Surya Ghar Muft Bijli Yojana
नवी दिल्ली : महिना संपला की वीज बिलाचे टेन्शन सर्वसामान्यांना येतच. मात्र, नागरिकांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारची एक मोठी योजना सुरू आहे. 'पीएम सूर्य घर मोफत वीज योजना' असे या योजनेचे नाव असून, याद्वारे तुमचे घरगुती वीज बिल 'शुन्य' होऊ शकते. या खास योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी 'प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजने'ची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत घरांच्या छतावर सोलर पॅनेल लावण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. हे अनुदान सोलर पॅनेलच्या एकूण खर्चाच्या ४०% पर्यंत असू शकते. या योजनेद्वारे देशभरातील १ कोटी घरांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेमुळे सरकारचे दरवर्षी अंदाजे ७५,००० कोटी रुपये वाचणार आहेत.
सोलर पॅनेल बसवण्यासाठी सरकार ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करत आहे. यामध्ये खर्चाच्या ४० टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते:
१ किलोवॅटसाठी: ३०,००० रुपये.
२ किलोवॅटसाठी: ६०,००० रुपये.
३ किलोवॅट किंवा अधिक: ७८,००० रुपये.
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे तयार ठेवा:
१. आधार कार्ड आणि पत्ता पुरावा.
२. चालू वीज बिल.
३. उत्पन्नाचा दाखला आणि रेशन कार्ड.
४. बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो.
५. नोंदणीकृत मोबाईल नंबर.
१. योजनेच्या अधिकृत पोर्टलवर (solarrooftop.pmsuryaghar.gov.in) जाऊन 'Apply for Solar Rooftop' वर क्लिक करा.
२. तुमचा राज्य, वीज वितरण कंपनी आणि ग्राहक क्रमांक नोंदवा.
३. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून नोंदणी पूर्ण करा.
४. लॉगिन केल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
५. अर्ज मंजूर झाल्यानंतर सौर संच बसवण्याची प्रक्रिया सुरू होईल.