पंतप्रधान मोदींची दुसऱ्या दिवशीही विवेकानंद शिलेवर ध्यानधारणा; पहा व्हिडीओ

पंतप्रधान मोदींची दुसऱ्या दिवशीही विवेकानंद शिलेवर ध्यानधारणा; पहा व्हिडीओ

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दणदणाट कमी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कन्याकुमारीत ४५ तासांच्या ध्यानधारणेला सुरुवात केली आहे. आज दुसऱ्या दिवशीही मोदी येथील विवेकानंद शिलेवर जिथे स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केले होते तिथे ध्यान करत आहेत. शनिवारी १ जूनपर्यंत ते येथे ध्यान करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी दौऱ्यावर आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत मोदी येथे ध्यान करणार आहेत. आज त्यांच्या ध्यानाचा दुसरा दिवस आहे. मोदींच्या ध्यानाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये मोदी भगवा कुर्ता आणि गमछ्यात दिसत आहेत. स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्यासमोर बसून ते ध्यान करत आहेत. त्याच्या हातात जपमाळ आहे आणि 'ओम…' असा जप सुरू आहे.

या ध्यानमंडपाची खास गोष्ट म्हणजे हे तेच ठिकाण आहे जिथे स्वामी विवेकानंदांनी देशाचा दौरा केल्यानंतर तीन दिवस ध्यान केले होते. येथेच त्यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले. देवी पार्वतीने या ठिकाणी एका पायावर उभे राहून ध्यान केले होते, असेही मानले जाते. मोदी यांनी काल प्रारंभी कन्याकुमारीत पोहोचल्यानंतर भगवती देवी अम्मन मंदिरात (कन्याकुमारी मंदिर) दर्शन घेतले आणि पूजा केली होती. पंतप्रधानांच्या या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली गेली असून, शनिवारपर्यंत पर्यटकांसाठी प्रवेशबंदीचे आदेश जारी केले गेले आहेत.

दरम्यान, मोदींची ध्यानधारणा टी. व्ही. वर दाखवली गेली तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ध्यान करण्याची खरी गरज ५ ते ७ वर्षांपूर्वीच होती, असे नमूद केले. मोदी जेथे ध्यानधारणा करणार आहेत, तेथे भारताची सीमा संपते. तेथून पुढे फक्त पाणीच पाणी आहे. उष्णता फार असल्याने मोदींना कदाचित अंटार्क्टिकाला जायचे असेल, असे ते पुढे म्हणाले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news