PM Narendra Modi | जनजातीय गौरव दिवस आता राष्ट्रीय उत्सव झाला : पंतप्रधान नरेंद्र मोदी!

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे कार्यक्रम : दृरदृश्य प्रणालीद्वारे केले मार्गदर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले
Published on: 
Updated on: 

गडचिरोली: जनजातीय गौरव दिवस हा आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहास आणि त्यांच्या समृद्ध संस्कृतीची गाथा सांगणारा पर्व असून, हा दिवस आता राष्ट्रीय उत्सव झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे आयोजित जनजातीय गौरव दिन कार्यक्रमात दृरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते. राज्यपाल जिष्णूदेव वर्मा, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम, राज्यमंत्री दुर्गादास उईके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, राज्यमंत्री निलय नाईक, आशिष जयस्वाल, खासदार डॉ.नामेदव किरसान, आ.डॉ.मिलिंद नरोटे उपस्थित होते.

पंतप्रधान पुढे म्हणाले, पूर्वी अनेक उत्सव विदेशी दृष्टीकोनातून साजरे केले जात होते. परंतु आपल्या सरकारने २०२१ पासून आदिवासी गौरव दिवसाची सुरुवात केल्यानंतर देशातील आदिवासी स्वदेशी स्वाभिमानानं आपल्या क्रांतिकारकांचं स्मरण करतात. आता देशाचं नेतृत्व आदिवासी महिला करीत असल्याचंही पंतप्रधानांनी अभिमानानं सांगितलं.

देशातील ५० कोटीहून अधिक आदिवासी आणि अन्य वंचितांना दारिद्रय रेषेतून वर आणणे आणि नक्षलवादाचं समूळ उच्चाटणं या दोन मोठ्या गोष्टी सरकारनं केल्यामुळे आदिवासी समाज आता भयमुक्त जीवन जगत असून, त्यांच्या उत्पननात भर पडत असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं.

नक्षलवाद मुक्त झालेल्या राज्यांतील आदिवासी जनतेनं यंदा प्रथमच आनंदात दिवाळी साजरी केली. हा केवळ दिव्यांचा प्रकाश नाही, तर त्यांच्या जीवनातील आशेचा किरण आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. याप्रसंगी पंतप्रधानांनी १७० योजनांचे लोकार्पण आणि ७० योजनांची पायाभरणी केली. शिवाय केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळालेल्या महाराष्ट्र,गुजरात आणि तेलंगणा राज्यातील तीन निवडक लाभार्थींशी संवाद साधला.

याप्रसंगी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा, केंद्रीय मंत्री जुएल ओराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचीही भाषणे झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.