

PM Modi Diwali Greeting :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी भारतीयांना ट्विट करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये शुभेच्छांसह एक आवाहन देखील केलं. त्यांनी संपूर्ण भारतीयांना भारतीय उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर तुम्ही काय खरेदी केलं हे सोशल मीडियावर देखील शेअर करा असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमधून सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'दिवळीच्या मंगल प्रसंगी सर्वांना शुभेच्छा. हा दिव्यांच्या सण आपल्या आयुष्यात सद्भावना, आनंद आणि भरभारट घेऊन येऊ देत.'
याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ट्विट करून भारतीयांना एक महत्वाचं आवाहन केलं होतं. त्यांनी १४० कोटी लोकांना स्वदेशीवर भर देण्याचं आवाहन केलं. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'यंदाचा दिवाळी सण १४० कोटी भारतीय लोकांच्या कष्ट, क्रिएटिव्हिटी आणि नाविण्यपूर्णतेला समर्पित करूया. आपण भारतीय उत्पादनंच खरेदी करूयात. गर्वानं म्हणा हे स्वदेशी आहे! त्याचबरोबर तुम्ही कोणती स्वदेशी उत्पादनं खरेदी केली ते सोशल मीडियावर देखील शेअर करा, याद्वारे तुम्ही दुसऱ्यांना देखील स्वदेशी खरेदी करण्यासाठी प्रेरित कराल.'
जेव्हापासून अमेरिकेनं भारतावर ५० टक्के टॅरिफ लावलं आहे. तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण एक देश म्हणून सर्व गोष्टींमध्ये स्वयमपूर्ण असलं पाहिजे असा आग्रह धरला आहे. त्याद्वारे त्यांनी स्वदेशीचा नारा देत एक कॅम्पेन देखील सुरू केलं आहे.
देशांतर्गत मार्केटमध्ये बूस्ट करण्यासाठी आणि अमेरिकेच्या टॅरिफ वाढवण्यानं मार्केटवर झालेला परिणाम कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं जीएसटीच्या स्लॅबमध्ये मोठी कपात केली होती. मुख्यतः फक्त २ स्लॅब ठेवल्यानं अनेक उत्पादनाच्या किंमती कमी झाल्या आहेत.