PM मोदी ३ दिवसांच्या ब्रुनेई, सिंगापूरच्या दौऱ्यासाठी रवाना

PM Modi Brunei Visit : सेमीकंडक्टर- फ्री ट्रेड करारावर फोकस
PM Narendra Modi
'मी भेटीसाठी उत्सुक'! PM मोदींनी दिली परदेश दौऱ्याची माहितीFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी तीन दिवसांच्या ब्रुनेई (PM Modi Brunei Visit) आणि सिंगापूरच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. भारत आणि ब्रुनेई दरम्यान द्विपक्षीय ४० वर्षांचे राजनैतिक संबंध आहेत. तरीही ब्रुनेईला भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. ब्रुनेई हे आशियातील छोटे बेट राष्ट्र आहे. ब्रुनेई सोबत सेमीकंडक्टर क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची शक्यता आहे.

ब्रुनेईच्या दौऱ्यानंतर पीएम मोदी ४ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर दरम्यान दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याशी चर्चा करतील. सिंगापूरसोबत मुक्त व्यापार कराराबाबत सामंजस्य करारही होणे अपेक्षित आहे.

दोन देशांच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पीए मोदी यांनी X ‍‍‍वर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "पुढील दोन दिवसांत ब्रुनेई दारुस्सलाम (Brunei Darussalam) आणि सिंगापूरला (Singapore) भेट देईन. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांशी भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल."

भारत- ब्रुनेई द्विपक्षीय संबध मजबूत करण्यावर भर

महामहिम सुल्तान हाजी हसनल बोलकिया यांच्या निमंत्रणावरुन पीएम मोदी ब्रुनेई दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. संरक्षण, व्यापार, ऊर्जा आणि अंतराळ तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) सचिव (पूर्व) जयदीप मजुमदार यांनी सांगितले की, भारत आणि ब्रुनेई संरक्षण क्षेत्रात संयुक्त कार्यकारी गट स्थापन करण्याच्या दिशेने काम करत आहेत.

“भारत-ब्रुनेई राजनैतिक संबंधांना ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. मी महामहिम सुल्तान हाजी हसनल बोलकिया यांची भेट घेण्यास उत्सुक आहे,” असे पीएम मोदी यांनी X ‍‍‍‍वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

पीएम मोदींचा सिंगापूर दौरा

पीएम मोदी यांचा ६ वर्षांतील हा पहिला सिंगापूर दौरा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) ने म्हटले आहे की, या दौऱ्याच्या माध्यमातून सिंगापूरमधील नवीन नेत्यासह, द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.

PM Narendra Modi
सुनीताच्या यानातून येत आहेत विचित्र आवाज

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news