PM Modi Italy Visit: इटलीत पोहोचताच पंतप्रधान मोदी आणि मेलोनींची खास सेल्फी व्हायरल; एकदा कॅप्शन बघाच

PM Modi Meloni selfie Rome: पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या युरोप दौऱ्यावर असून मंगळवारी संध्याकाळी इटलीत दाखल झाले.
PM Modi Italy Visit Georgia Meloni selfie Rome
PM Modi Italy Visit Georgia Meloni selfie RomeGeorgia Meloni Instagram
Published on
Updated on

PM Modi Italy Visit Georgia Meloni selfie Rome

रोम : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या युरोप दौऱ्यावर असून मंगळवारी संध्याकाळी इटलीत दाखल झाले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या विशेष निमंत्रणावरून होत असलेला हा दौरा पंतप्रधान मोदींचा इटलीचा पहिलाच अधिकृत द्विपक्षीय दौरा आहे. पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून मोदींसोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे.

'रोममध्ये तुमचे स्वागत आहे, माझ्या मित्रा' असे कॅप्शन मेलोनी यांनी या फोटोला दिले असून, अवघ्या काही मिनिटांतच हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये दुबईतील 'COP28' परिषदेदरम्यान मेलोनी यांनी शेअर केलेली 'गुड फ्रेंड्स' सेल्फी आणि २०२४ मध्ये इटलीतील 'G7' परिषदेदरम्यानचा "हॅलो फ्रॉम मेलोडी टीम" हा व्हिडिओ जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, पंतप्रधान मोदींचे हॉटेलवर आगमन होताच तेथील अनिवासी भारतीयांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधानांना वाराणसीच्या घाटांचे विहंगम दृश्य रेखाटलेली एक सुंदर पेंटिंग भेट म्हणून देण्यात आली.

दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये द्विपक्षीय चर्चा

राजनैतिक आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या दौऱ्यात पंतप्रधान मोदी इटलीचे राष्ट्रपती सर्जियो मटारेला यांची भेट घेणार आहेत. तसेच, पंतप्रधान मेलोनी यांच्यासोबत त्यांची व्यापक द्विपक्षीय चर्चा होणार असून, दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योगपतींशी ते संवाद साधतील. याशिवाय, मोदी संयुक्त राष्ट्रांच्या 'अन्न आणि कृषी संघटनेच्या' मुख्यालयालाही भेट देणार आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ पासून दोन्ही पंतप्रधानांमधील ही ८ वी भेट आहे, जी भारत आणि इटलीमधील दृढ होत चाललेल्या संबंधांची साक्ष देते. या दौऱ्यात दोन्ही नेते 'संयुक्त धोरणात्मक कार्ययोजना २०२५-२९' च्या प्रगतीचा आढावा घेणार असून संरक्षण, दहशतवादी कारवायांना मिळणाऱ्या आर्थिक रसदीला लगाम घालणे आणि नवीन क्षेत्रांमधील सहकार्याचा रोडमॅप अंतिम करणार आहेत.

१.३ लाख कोटींचा व्यापार; २०२९ पर्यंत मोठे उद्दिष्ट

युरोपीय संघात इटली सध्या भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. २०२५ मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार १४.२५ अब्ज युरोवर (सुमारे १.३ लाख कोटी रुपये) पोहोचला आहे. आता दोन्ही देशांनी २०२९ पर्यंत हा व्यापार २० अब्ज युरोपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. इटलीच्या कंपन्यांनी भारतात ३.६६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे, तर 'टाटा मोटर्स'ने इटलीच्या 'इवेको ग्रुप'चे अधिग्रहण केल्यामुळे भारतीय कंपन्यांचा आत्मविश्वासही युरोपमध्ये वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news