पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता कधी जमा होणार?

PM Kisan 20th Installment| जाणून घ्या यादीत तुमचे नाव आहे की नाही ते कसे तपासायचे
PM Kisan 20th Installment
PM Kisan 20th InstallmentFile Photo
Published on
Updated on

PM Kisan 20th Installment Date updates

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आज आम्ही तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता कधी येईल आणि तुमचे नाव योजनेच्या नवीनतम यादीत आहे की नाही हे कसे तपासायचे याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या...

PM किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम-किसान) २० व्या हप्ता कधी जमा होणार यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात पाठवली जाते. आता या योजनेचा २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम किसान योजनेचा शेवटचा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी करण्यात आला.

PM Kisan 20th Installment
PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता कधी मिळणार? कशी करावी ई-केवायसी

PM किसान सन्मान निधी योजना काय आहे?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे आहे.

२० वा हप्ता नेमका कधी येणार?

सरकार वर्षातून तीनदा पीएम किसान योजनेचे हप्ते साधारणपणे ४-४ महिन्यांच्या अंतराने पाठवते. सरकारने यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये १९ वा हप्ता जारी केला होता. अशा परिस्थितीत, २० वा हप्ता ४ महिन्यांनंतर म्हणजे जून २०२५ मध्ये कधीही येऊ शकतो. सरकारने यासाठी कोणतीही अधिकृत तारीख दिलेली नाही परंतु, लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

PM Kisan 20th Installment
PM Kisan Yojana | 'हे' लाभार्थी PM किसान योजनेपासून राहणार वंचित

यादीत तुमचे नाव कसे तपासायचे ते जाणून घ्या

पुढील हप्ता मिळविण्यासाठी तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर अशा प्रकारे तुम्ही यादीत तुमचे नाव सहजपणे तपासू शकता.

– सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.

– होम पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ‘लाभार्थी यादी’ पर्यायावर क्लिक करा.

– आता तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा आणि ‘रिपोर्ट मिळवा’ वर क्लिक करा.

– आता लिस्टमध्ये तुमचे नाव शोधा

OTP द्वारे असे  तपासा

– सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.

- येथे eKYC पर्यायावर क्लिक करा.

– आता आधार क्रमांक आणि कॅप्चा एंटर करा.

– यानंतर, नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल, तो एंटर करा आणि सबमिट करा.

PM Kisan 20th Installment
PM Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता

बायोमेट्रिकद्वारे असे तपासा 

- जवळच्या सीएससी केंद्रात जा.

- तेथे फिंगरप्रिंट स्कॅन करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news