

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे सर्व परीक्षा रद्द करण्याऐवजी उत्तरपत्रिकांचे पुर्नमुल्यांकन करण्याच्या मागणीसाठी ५ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परीक्षा रद्द केल्यास विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होईल, असे याचिकेत म्हटले आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कलम १४, १९ आणि २१ अंतर्गत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन ठरणार असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याने परीक्षा रद्द करण्याऐवजी उत्तरपत्रिकांचे पुर्नमुल्यांकन करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.