

ChatGPT :
ओपन AI कंपनीच्या चॅट जीपीटीवर करोडो युजर्स हे आपलं जीवन संपवण्याबाबत चर्चा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती खुद्द OpenAI ने दिली आहे. त्यांनी सांगितलं की करोडो युजर्स हे मानसिक आरोग्य आणि मानसिक तणावाबाबत AI सोबत चर्चा करत आहेत.
कंपनीनं सांगितलं की, चॅट जीपीटवर प्रत्येक आठवड्यात ८० कोटी युजर्स आपलं जीवन संपवण्याबाबत चॅटिंग करत आहेत. ते आपल्या समस्या चॅटबॉशी शेअर करत आहेत. त्याच्याकडून सल्ला देखील मागत आहेत. कंपनीनं सांगितलं की एकूण युजर्सच्या तुलनेत अशी चर्चा करणारे युजर्स हे ०.१५ टक्तेच आहेत.
ओपन ai नं सांगितलं की या आकडेवरून आणि प्रश्नावरून लोकं चॅट जीपीटबाबत किती भावूक आहेत हे दर्शवते. दरम्यान, कंपनीनं जे युजर्स जीवन संपवण्याबाबत चॅट जीपीटीला विचारत आहेत. त्यांना हा चॅट बॉट काय उत्तर देतो हे मात्र सांगितलेलं नाही.
ओपन ai नं सांगितलं की एआय सोबतचे अशा प्रकारचं संभाषण तुलनेनं खूप कमी आहे, मात्र या गोष्टीकडं वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. कंपनीनं ही माहिती शेअर करत आम्ही या प्रकारच्या चॅटवर देखील काम करत आहोत असं सांगितलं.
ओपन एआयनं सांगितलं की ते जवळपास १७० मानसिक आरोग्य तज्ज्ञांसोबत काम करत आहेत. हे तज्ज्ञ AI Chatbot ला जीवन संपवण्याबाबतच्या प्रश्नाला कशा प्रकारे उत्तर द्यायचं आणि त्यांचा ताण कमी करायचा याचं प्रशिक्षण देणार आहेत.
ओपन एआयच्या मतानुसार त्यांचे नवे मॉडेल आधीपेक्षा या प्रकारच्या प्रश्नांना अजून प्रभावीपणे उत्तर देईल. नुकतेच जगभरात मानसिक आरोग्य आणि चॅट बॉटची त्यामधील भूमिका याच्यावर चर्चा होत आहे.
अनेक इतर अभ्यासांमध्ये दावा केला जात आहे की AI चॅटबॉट युजर्सना जो सल्ला देत आहेत तो वास्तवात चुकीचा आहे. या सल्ल्यामुळं युजर्सचं नुकसान होण्याची शक्यता आहे. ओपन एआय सध्या एका कोर्ट केसचा देखील सामना करत आहे. ही केस १६ वर्षाच्या मुलाबाबत आहे.
एका मुलानं चॅट जीपीटीला आत्महत्येसंदर्भात प्रश्न विचारले होते. त्यानंतर त्या मुलानं आपला जीव दिला. त्यानंतर AI वर आरोप झाले की याच चॅटबॉटनं त्या मुलाला आपलं जीवन संपवण्यासाठी उकसवलं.