

नवी दिल्ली : भारत पाकिस्तान युद्धामध्ये सध्या युद्धविराम झाला असला तरी पाकिस्तानकडून सिझफायरचे वारंवार उल्लघंन सुरुच आहे. १० रोजी युद्धविराम झाल्यानंतर काही तासातच पाकिस्तानने लगेचच ड्रोन हल्ले सुरु केले होते. पण भारताने हे हल्ले खंबीरपणे परतवून लावले होते. दरम्यान आज सोमावारी रात्री दहा वाजता जम्मू काश्मीरच्यास सांबा सेक्टर मध्ये काही ड्रोन दिसले आहेत. एएनआयने याचे वृत्त दिले आहे. दरम्यान याबाबत घाबरण्यासारखे काहीच नसल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले आहे.
रविवार व सोमवारी गोळीबार किंवा हल्ल्याच्या घटना पुढे आल्या नाहीत पण सोमवारी रात्री आठ वााजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका जगासमोर मांडली. त्यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला थेट इशाराच दिला आहे. पाकिस्तान सरकार व दहशतवादी यांच्यातील संबध त्यांनी जगासमोर मांडले. तसेच मागे दहशतवादाचा पूर्ण बिमोड करणार असल्याचे ठणकावून सांगितले. मोदी यांच्या भाषणानंतर काही वेळातच हे ड्रोन निर्दशनास आले आहेत.
दिसलेले हे ड्रोन अगदी कमी प्रमाणात हे ड्रोन असल्याने यामध्ये घाबरण्यासारखे काहीही नाही असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. तरी सुद्ध बेभरवशाच्या पाकिस्तानकडून काहीही होऊ शकते त्यामुळे भारतीय लष्कर पूर्णतः तयार आहे. सुरक्षेचे उपाय म्हणून याठिकाणी पूर्णता ब्लॅक आऊट होते. त्याचदरम्यान सांबा येथे भारताच्या हवाई संरक्षण दलाने पाकिस्तानी ड्रोन रोखले. त्याठिकाणी काहीवेळा लाल रेषा दिसल्या आणि स्फोटासारखे आवाज ऐकू आले.