Pm Modi Warning Pakistan | अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीला भारत भीक घालणार नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा

PM Narendra Modi on Operation Sindoor | पंतप्रधानांनी दिला पाकिस्‍तानला इशारा
Pm Modi Warning Pakistan
PM Narendra ModiImage Source X
Published on
Updated on

नवी दिल्‍ली : भारताला कोणीही अणुबॉम्‍बची भिती घालू नये, न्युक्‍लीअर ब्‍लॅकमेल आम्‍ही सहन करणार नाही, अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीला भारत भीक घालत नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. भारत पाकिस्‍तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आज सायंकाळी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्‍यांनी ऑपरेशन सिंदूर व युद्धाबाबत देशाची भूमिका स्‍पष्‍ट केली. यापुढे भारत कदापीही दहशतवाद सहन करणार नाही असा स्‍पष्‍ट संदेश त्‍यांन जगाला दिला आहे.

दहशतवाद्यांना पोसणारे भारताला ‘न्युक्‍लीअर ब्‍लॅकमेल’ करत आहेत हे कदापी सहन केले जाणार नाही. या ब्‍लॅकमेलच्या आडून चालणाऱ्या दहशतवादावर भारत सटीक व निर्णायक वार करेल असेही मोदी यांनी यावेळी सांगितले. या संदेशातून मोदी यांनी यापूढे भारत दहशतवादाला सहन केले जाणार नाही असे स्‍पष्‍ट केले आहे.

Pm Modi Warning Pakistan
PM Narendra Modi on Operation Sindoor : एक दिवस पाकिस्तान संपून जाईल; कारवाई तात्पुरती स्थगित केल्याचा मोदींचा इशारा

पुढे त्‍यांनी म्‍हटले की दहशतवाद पोसणारे सरकार व दहशतवादी म्‍होरके यांना वेगवेगळे समजणार नाही तर त्‍यांना एकाच तराजूत तोलेले जाईल. त्‍यांनी यातून पाकिस्‍तान सरकारवर थेट निशाणा साधला आहे व यापूढे होणाऱ्या दहशतवादी कारवायांना थेट पाकिस्‍तानलाच जबाबदार धरले जाईल असे अप्रत्‍यक्षपणे स्‍पष्‍ट केले आहे. याबरोबर मोदी यांनी आपल्‍या भाषणात सैन्यदलाचे आभार मानले आहेत. तसेच ऑपरेशन सिंदूर हे केवळ स्‍थगित कले आहे थांबवलेले नाही असेही त्‍यांनी सांगितले.

Pm Modi Warning Pakistan
Operation Sindoor: पाकचे मिराज विमान पाडले; भारतीय हवाईदलाने 150 किलोमीटर आत घुसून हल्ला केल्याचे स्पष्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news