

Pakistan Ceasefire Violation : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला. सलग दोन दिवस भारताने दिलेल्या तडाख्यानंतर पाकिस्तानचे कबंरड मोडलं. शनिवारी (१० मे) भारत पाकिस्तान शस्त्रसंधी करार झाला. मात्र अवघ्या तीन तासांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नापाक हल्ला केला. शांततेच्या चर्चेनंतरही शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्या प्रकरणी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पाकिस्तानला शेरोशायरीतून टोला लागवला.
पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यावर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी 'एक्स'वर लिहिले की, "उसकी फितरत है मुकर जाने की, उसके वादे पे यकीन कैसे करूं?" . दरम्यान, एक्स पोस्ट करण्याच्या काही तास आधी 'पीटीआय'शी बोलताना शशी थरुर म्हणाले की, "माझ्या मते शांतता अत्यावश्यक आहे. भारत कधीच दीर्घकालीन युद्धाची इच्छा ठेवत नाही, पण दहशतवाद्यांना धडा शिकवणे आवश्यक होते. तो धडा शिकवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
शशी थरुर यांनी ऑपरेशन सिंदूर या मोहिमेचे, नावाचे आणि प्रतिमेचे कौतुक केले होते. त्यांनी म्हटले होते की, ‘ऑपरेशन सिंदूर’ हे एक प्रभावशाली नाव आहे. हे नाव आपल्या राष्ट्रीय जाणीवेत कोरलेली ती प्रतिमा जागवते.
२२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर भारताने हल्ला केला. आज दोन दिवसांच्या धडक कारवाईनंतर पाकिस्तानने गुडघे टेकले. शनिवारी (१० मे) भारत पाकिस्तान शस्त्रसंधी करार झाला. मात्र यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये पाकिस्तानने पुन्हा हल्ला करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.शनिवारी रात्री श्रीनगर आणि जम्मूमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले. भारताने पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा तीव्र निषेध केला, आणि या हल्ल्यांना विश्वासघाताचा गंभीर प्रकार असे संबोधले आहे.