

Poonch Infiltration Bid Foil
पुंछ : भारतीय सैन्याने आज (दि. ३०) सकाळी नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. जलद कारवाई आणि अचूक गोळीबारामुळे त्यांचे नापाक मनसुबे उधळून लावले गेले. या कारवाईत तीन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
गुप्तचर युनिट्स आणि जेकेपीकडून मिळालेल्या समन्वयात्मक आणि गुप्तचर माहितीमुळे ही कारवाई यशस्वी झाली. डेंघवार सेक्टरमध्ये संशयास्पद हालचाल दिसून आल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून हे दहशतवादी भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र भारतीय जवानांनी तत्काळ प्रतिसाद देत त्यांना निष्क्रीय केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या या भागात ऑपरेशन सुरू असून अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. परिसर पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.