पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप विरोधी इंडिया आघाडीच्या स्थापनेत मी महत्त्वाी भूमिका बजावली होती. या आघाडी नावही मी दिले होते;पण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेची इंडिया आघाडीमध्ये नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीमध्ये नाही. त्यामुळे राज्यात सीपीआय(एम) आणि काँग्रेसवर विश्वास ठेवू नका. ते आमच्यासोबत नसून भाजपसोबत आहेत, असा गंभीर आरोप करत लोकसभा निवणडुकीनंतर इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर यामध्ये तृणमूल काँग्रेस सहभागी होणार नाही. आमचा बाहेरुन पाठिंबा असेल, असे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर सभेत स्पष्ट केले.
बुधवारी जाहीर सभेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आमचा पक्ष इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी बाहेरुन पाठिंबा देईल. यानंतर नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA) रद्द करण्याचे आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) आणि समान नागरी संहिता (UCC) कायदे रद्द केले जातील.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीमध्ये नाही. त्यामुळे राज्यात सीपीआय(एम) आणि काँग्रेसवर विश्वास ठेवू नका. ते आमच्यासोबत नसून भाजपसोबत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
यंदाच्या लोकसभघ निवडणूक भाजप ४०० पारचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरेल. इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही बाहेरुन पाठिंबा देऊ. पश्चिम बंगालमध्ये आमच्या माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.