Opration Tiger | ऑपरेश टायगर यशस्वी ! आज पत्रकार परिषदेत घोषणा होण्याची शक्यता 

संसदेच्या वतीने काढल्या जाणाऱ्या बुलेटिन यावर शिक्कामोर्तब होणार
Opration Tiger
Opration Tiger Pudhari
Published on
Updated on

नवी दिल्ली : मागील आठवडाभर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहेत. हे ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदेंनी यशस्वीरित्या पूर्ण केले असून त्याची औपचारिक घोषणा आज होणार असल्याचे समजते. संसदेच्या वतीने काढले जाणारे बुलेटिन यावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. सोबतच शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे संसदीय नेते डॉ. श्रीकांत शिंदे मुंबईत एक पत्रकार परिषद देखील घेण्याची शक्यता आहे. १६ जूनपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले. त्यानंतर विविध टप्प्यांमध्ये हे ऑपरेशन यशस्वी करण्यात आले. याची सूत्रे मुंबईसह दिल्ली आणि महत्त्वाच्या ठिकाणाहून हल्ल्याचे समजते. 

आज खासदार आपापल्या मतदारसंघात 

सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ बंडखोर खासदार आपापल्या मतदारसंघात उपस्थित राहणार आहेत. ६ पैकी ओमराजे निंबाळकर आधीच मतदारसंघात आहेत तर संजय दिना पाटील देखील मुंबईत आहेत. त्या व्यतिरिक्त संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे हे ४ खासदार मतदारसंघात ४-५ दिवसांच्या घडामोडींनंतर मतदारसंघात दिसणार आहेत. सर्व ६ खासदारांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे. सर्व ६ मतदारसंघात खासदारांचे स्वागत वाजत गाजत होईल, अशी अवस्था देखील त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केल्याचे समजते. 

हो, मी शिंदेंच्या शिवसेनेत गेलो.... खा. आष्टीकर यांची कबुली

६ बंडखोर खासदारांच्या गटात असलेले नागेश पाटील आष्टीकर यांनी रविवारी काही पत्रकारांशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांचा एक व्हिडिओ संदेश देखील जारी केला. यामध्ये मी शिंदेंच्या शिवसेनेत गेलो, असा कबुलीजबाब आष्टीकरांनी दिला. आष्टीकर म्हणाले की, मी सगळ्यांचा विचार करून गेलो, कार्यकर्त्यांचा विचार करून गेलो, मतदारसंघात निधी आणण्यासाठी हे पाऊल उचलले. मी कुठे इतरत्र गेलो नाही, मी शिवसेनेतून शिवसेनेतेच गेलो, मी माझी विचारधारा सोडली नाही, असेही ते म्हणाले. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news